बापरे! मृत्यूनंतर भिकाऱ्याच्या बॅगेतील रक्कम पाहून पोलिसही झाले अवाक्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 03:32 PM2019-06-28T15:32:13+5:302019-06-28T15:32:37+5:30

पोलिसांनी हे पैसे ताब्यात घेतले आणि रक्कम मोजली असता तब्बल  3 लाख 22 हजार 676 रुपये भिकाऱ्याच्या बॅगेतून मिळाल्याने पोलिसही आश्चर्यचकीत झाले

Over Three Lakh Rupees Found In Bag Of A Beggar After He Died | बापरे! मृत्यूनंतर भिकाऱ्याच्या बॅगेतील रक्कम पाहून पोलिसही झाले अवाक्... 

बापरे! मृत्यूनंतर भिकाऱ्याच्या बॅगेतील रक्कम पाहून पोलिसही झाले अवाक्... 

Next

विजयवाडा - आंध्र प्रदेशच्या अनंतपुर जिल्ह्यात एका मस्जिदीबाहेर पोलिसांनी जे मिळालं ते पाहून पोलिसही अवाक् झाले. मस्जिदीत येणाऱ्या काही लोकांनी पोलिसांना माहिती दिली की, मस्जिदीबाहेर एक भिकारी मृत अवस्थेत पडला आहे. झोपेतच या भिकाऱ्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून त्याची ओळख पटविण्यासाठी त्याच्या सामानाची तपासणी केली. भिकाऱ्याच्या बॅगेत चिल्लर आणि नोटा पोलिसांच्या हाती लागल्या. 

पोलिसांनी हे पैसे ताब्यात घेतले आणि रक्कम मोजली असता तब्बल  3 लाख 22 हजार 676 रुपये भिकाऱ्याच्या बॅगेतून मिळाल्याने पोलिसही आश्चर्यचकीत झाले. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता हा भिकारी बाशा नावाने परिसरात प्रसिद्ध आहे. गेल्या 12 वर्षापासून तो मस्जिदीबाहेर भीक मागण्याचं काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने मस्जिदीबाहेर वृद्ध व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती दिली. घटनास्थळावर पोहचलेल्या पोलिसांनी बाशाच्या बॅगेची तपासणी केली तेव्हा हे समोर आलं. 

बाशाच्या बॅगेत पोलिसांना त्याची ओळख पटविणारा कोणताही पुरावा सापडला नाही. मात्र भीक मागून जमा केलेले चिल्लर आणि नोटा सापडल्या. पोलिसांनी भिकाऱ्याचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला त्यानंतर बॅगेतील पैशांची मोजणी केली. बाशाने हे पैसे कधीच वापरले नाहीत. स्थानिक दुकानदारांसाठी बाशा चिल्लर एजेंट होता. त्याच्याकडे 500 रुपयांच्या नोटांचेही चिल्लर होते. चिल्लरच्या बदल्यात तो 5 किंवा 1 रुपया जास्त घेत असे. 
 

Web Title: Over Three Lakh Rupees Found In Bag Of A Beggar After He Died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस