विरोधकांनी संसदेत संवाद करावा : मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 06:40 AM2018-12-13T06:40:04+5:302018-12-13T06:40:25+5:30

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपाला निराश करणारे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्साहावर आणि लक्ष्यावर काही परिणाम होताना दिसत नाही.

Opposition to communicate in Parliament: Modi | विरोधकांनी संसदेत संवाद करावा : मोदी

विरोधकांनी संसदेत संवाद करावा : मोदी

Next

- संतोष ठाकूर

नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपाला निराश करणारे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्साहावर आणि लक्ष्यावर काही परिणाम होताना दिसत नाही. संसद अधिवेशनाआधी केलेल्या पहिल्या भाषणात ते म्हणाले, ज्या लोकांची नजर मे २०१९ वर आहे त्यांनी वाद-विवाद घालावा; परंतु संसद सभागृहात संवाद करावा.
भाजपाच्या सूत्रांनुसार संसद सत्राच्या पहिल्या दिवशीच संवादाचा उल्लेख करून २०१९ च्या तयारीचे संकेत मोदी यांनी दिले आहेत. याचा अर्थ असा की, मोदी या निकालांना भाजपासाठी अंतिम मानत नाहीत. या निकालांनी मोदी यांची जादू संपली, असे जे कोणी समजत असतील ते चूक आहेत. याचे कारण असे की, छत्तीसगड वगळता राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला ज्या जोरदार यशाची आशा होती ती धुळीस मिळाली. ही परिस्थिती मोदी यांच्या सभा आणि जनसंपर्क सभांमुळे निर्माण झाली. मोदी जेथे गेले तेथे मतांमध्ये ४-५ टक्के वाढ झाली. परिणामी, भाजपा पुन्हा स्पर्धेत आला आहे.

लोकांचा राग हा राज्याच्या नेतृत्वावर आहे. मोदी यांच्यावरील विश्वास कायम आहे. यामुळेच राजस्थानात काँग्रेसला आधी १५० जागा मिळतील असे दावे होते. तेथे मोदी यांच्या दौऱ्यांमुळे कसाबसा तो विजयाजवळ गेला. मध्यप्रदेशातही हीच स्थिती होती. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुका विरोधकांना २०१४ प्रमाणे कठीण जाणार असल्याचे भाजपातील सुत्रांनी नमूद केले.

Web Title: Opposition to communicate in Parliament: Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.