‘एक जागा, एक उमेदवार’ भाजपाविरोधात काँग्रेसचे सूत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 05:44 AM2018-06-05T05:44:13+5:302018-06-05T05:44:13+5:30

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘एक जागा, एक उमेदवार’ या सूत्रानुसार त्यांच्या वॉररूमने १५ राज्यांतील ४०३ जागा निश्चित केल्या आहेत. या जागांवर ते समविचारी पक्षांशी आघाडी करू शकतील.

 'One place, one candidate' Congress formula against BJP | ‘एक जागा, एक उमेदवार’ भाजपाविरोधात काँग्रेसचे सूत्र

‘एक जागा, एक उमेदवार’ भाजपाविरोधात काँग्रेसचे सूत्र

Next

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘एक जागा, एक उमेदवार’ या सूत्रानुसार त्यांच्या वॉररूमने १५ राज्यांतील ४०३ जागा निश्चित केल्या आहेत. या जागांवर ते समविचारी पक्षांशी आघाडी करू शकतील.
पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांत भाजपाचा पराभव करण्यासाठी राहुल तयार झाले आहेत. काँग्रेसच्या माजी नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी ते इच्छुक आहेत. अजित जोगी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पत्नीला फोन केला होता. जोगी छत्तीसगढमध्ये नवा पक्ष स्थापन करत आहेत. त्याचा फटका काँग्रेसला बसू शकेल. लोकसभेच्या १५ राज्यांतील ४०३ जागांपैकी किती जागा काँग्रेस लढवेल हे स्पष्ट नाही. आंध्र प्रदेशात २५, तेलंगणात १७, पश्चिम बंगालमध्ये
४२, ओडिशात २१ व दिल्लीतील
सात जागांचा गुंतागुंतीचा प्रश्न अजून सोडवायचा आहे.

या वेळी जास्त जागांची आशा
कर्नाटकातील २८ पैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी राहुल यांनी जनता दलाला मुख्य स्थान दिले. या राज्यात २०१४ मध्ये भाजपाने १७ जागा तर जनता दलाने (एस) दोन व काँग्रेसने नऊ
जागा जिंकल्या. लोकसभा निवडणुकीत तेथे जास्त जागा
जिंकू अशी राहुल यांना आशा आहे.

सहकारी पक्षांना जागा
बसपाशी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ राज्ये व देश पातळीवर आघाडी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
उत्तर प्रदेशात राहुल यांना लोकसभेच्या पुरेशा जागा हव्या असून, काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या राज्यांत ते सहकारी पक्षांना जागा सोडण्यास तयार आहेत.
मोदी यांचा मुकाबला करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी रणनीती तयार करण्यास त्यांनी सांगितले आहे.

प्रादेशिक पक्षांशी जोरदार चर्चा सुरू
काँग्रेस आसाममध्ये एयूडीएफशी महाराष्ट्रात व गुजरातेत राष्ट्रवादीशी समझोता होऊ शकतो. काश्मीरमध्ये अब्दुल्लांना सोबत घेण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसची बिहार, केरळ, तामिळनाडू व झारखंडमध्ये सहकारी पक्षांशी आघाडी आहेच. उत्तर प्रदेशात सपा, बसपा व रालोदशी चर्चा सुरू आहे.

मोदींच्या संवाद चातुर्यावर राहुल गांधी यांचे प्रश्नचिन्ह
पंतप्रधान मोदी यांनी सिंगापूरमध्ये दिलेल्या मुलाखतीतील मोठी चूक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर दाखवून दिली आहे. अत्यंत मार्मिक पद्धतीने टीका करताना त्यांनी मोदींच्या संवाद चातुर्याच्या क्षमतेवर टीका केली आहे.
सिंगापूरच्या विद्यापीठातील मुलाखतीत पूर्वलिखित प्रश्नोत्तरे ठरली असतानाही मोदी आपल्या पद्धतीने उत्तरे देत होते. त्यांची अनुवादक मात्र लिहून दिलेली उत्तरे ऐकवत होती. यावर राहुल यांनी म्हटले की, मोदी जे ऐनवेळी प्रश्नांना उत्तरे देतात, त्याच्यापेक्षा अनुवादकाला लिहून दिलेली उत्तरे वेगळीच असतात. राहुल यांनी मोदींचा व्हिडीओही अपलोड केला आहे. यात प्रश्नांवर मोदी काही बोलत आहेत व अनुवादक वेगळाच अनुवाद करताना दिसत आहेत.

Web Title:  'One place, one candidate' Congress formula against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.