केरळमध्ये जुना लोखंडी पूल कोसळला; एकाचा मृत्यू, 57 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2017 03:11 PM2017-10-30T15:11:57+5:302017-10-30T15:12:40+5:30

केरळमधील कोल्लम येथे जुना लोखंडी पादचारी पूल कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे.

Old iron bridge collapsed in Kerala; One dies, 57 others injured | केरळमध्ये जुना लोखंडी पूल कोसळला; एकाचा मृत्यू, 57 जण जखमी

केरळमध्ये जुना लोखंडी पूल कोसळला; एकाचा मृत्यू, 57 जण जखमी

Next
ठळक मुद्दे केरळमधील कोल्लम येथे जुना लोखंडी पादचारी पूल कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे.दुर्घटनेत ५७ जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर कालव्यात बुडून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे.

कोची- केरळमधील कोल्लम येथे जुना लोखंडी पादचारी पूल कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. या दुर्घटनेत ५७ जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर कालव्यात बुडून बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरु आहे.





 

कोल्लम येथील चवारा येथे कालव्यावर जुना लोखंडी पादचारी पूल होता. केरळ मिनरल्स अँड मेटल्स लिमिटेड या कंपनीच्या आवारात हा पूल होता. सोमवारी सकाळी हा पूल कोसळला असून दुर्घटनेच्या वेळी सुमारे ७० कामगार पुलावर होते. सकाळी साडे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. 



 

दुर्घटनेनंतर कामगार कालव्यात बुडून बेपत्ता झाले असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहेय त्यानुसार शोध सुरु आहे. सोमवारी सकाळी पडलेल्या पुलाची अवस्था धोकादायक होती, असंही बोललं जातं आहे.  जखमींवर सध्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार  सुरू आहेत. 

Web Title: Old iron bridge collapsed in Kerala; One dies, 57 others injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.