ऑड-इव्हन: दिल्ली सरकार समोर आहेत ही मोठी आव्हानं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 08:45 AM2017-11-10T08:45:26+5:302017-11-10T08:47:48+5:30

दिल्लीतील ऑड-इव्हन स्कीचा चा तिसरा पार्ट आता 13 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. ऑड-इव्हनच्या पार्ट वन आणि पार्ट टू च्या तुलनेत यावेळी दिल्ली सरकारसाठी ऑड-इव्हन सगळ्यात आव्हानात्मक असेल.

Odd-Eveen: These big challenges are being faced by the Delhi government | ऑड-इव्हन: दिल्ली सरकार समोर आहेत ही मोठी आव्हानं

ऑड-इव्हन: दिल्ली सरकार समोर आहेत ही मोठी आव्हानं

Next
ठळक मुद्देदिल्लीतील ऑड-इव्हन स्कीचा चा तिसरा पार्ट आता 13 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. ऑड-इव्हनच्या पार्ट वन आणि पार्ट टू च्या तुलनेत यावेळी दिल्ली सरकारसाठी ऑड-इव्हन सगळ्यात आव्हानात्मक असेल.

नवी दिल्ली- दिल्लीतील ऑड-इव्हन स्कीमचा तिसरा पार्ट आता 13 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. ऑड-इव्हनच्या पार्ट वन आणि पार्ट टू च्या तुलनेत यावेळी दिल्ली सरकारसाठी ऑड-इव्हन सगळ्यात आव्हानात्मक असेल. ऑड-इव्हनच्या पहिल्या दोन पार्टसाठी सरकारला पूर्व तयारी करायला योग्य वेळ मिळाला होता. ऑड-इव्हन लागू झाल्यावर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यासाठी सरकारने 15 दिवस आधीपासून तयारी सुरू केली होती. यावेळी ग्रेडेड अॅक्शन प्लानच्या अंतर्गत दिल्ली सरकार ऑड-इव्हन लागू करतंय.  सोमवारीपासून स्कीम लागू होणार असल्याने सरकारकडे पूर्व तयारीसाठी फक्त तीन दिवस आहेत. कॉन्ट्रॅक्ट कॅरेजच्या किती जादा बसेस मिळणार याबद्दल अजून काही निश्चित झालेलं नाही. गुरूवारी संध्याकाळपासून डीटीसीपासून पुन्हा एकदा बस ऑपरेटर्सला फोन केले जात असून बसेसची सुविधा करण्याची तयारी सुरू आहे. 

शाळा सुट्टी दिली तर मिळतील 500 जादा बसेस
परिवहन मंत्री कैलास गहलोत यांच्यानुसार, डीटीसीला प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट कॅरेजला 500 आणि डीएमआरसीला 100 लहान बसची सोय करायला सांगितलं आहे. दिल्लीत पहिल्यांदा जेव्हा ऑड-इव्हन लागू झालं तेव्हा शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे 1200 जादा बसेस मिळाल्या तर दुसऱ्या ऑड-इव्हनमध्ये पाचशेपेक्षा जास्त बसेस मिळाल्या. वाहतुकीमध्ये प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट कॅरेजच्या बस कशा जोडल्या जाणार? हे मोठं आव्हान दिल्ली सरकारसमोर आहे. 

सीएनजी स्टिकरचा मुद्दा महत्त्वाचा
सरकारने यावेळी आयजीएलच्या 21 स्थानकांवर सीएनजी स्टिकर लावण्याचा निर्णय घेतला आहे. ऑड-इव्हनच्या आधी हे स्टिकर मिळायला वेळ फार कमी आहे. त्यामुळे स्टेशनवर मोठी गर्दी होऊ शकते. ऑड-इव्हनमधून सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांना वगळण्यात आलं आहे. गेल्यावेळी सीएनजी स्टिकर त्रासदायक ठरलं  होतं. परिवहन मंत्र्यांच्या माहितीनुसार यावेळी स्टिकरच्या मुद्द्यावर सावधगिरी बाळगली जाणार आहे. पण कमी वेळात हजारो स्टिकर जारी करणं मोठं आव्हान आहे. 

अॅपवर बुकिंग होणाऱ्या टॅक्सीची मनमानी थांबवणंही आव्हान
दिल्ली सरकारसमोर अॅपरून बुकिंग होणाऱ्या टॅक्सीची मनमानी थांबविण्याचंही आव्हान आहे. सरकारने यावेळी ओला-उबर कंपन्यांसोबत बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑड-इव्हन लागू केल्यानंतर या कंपन्यांकडून जादा पैसा आकारला जाऊ नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

दिल्लीत लग्नाचा सिजन
दिल्लीमध्ये लग्नाचा सिजन सुरू आहे. 13 ते 17 नोव्हेंबर या दिवसांमध्ये दिल्ली बऱ्याच ठिकाणी लग्न आहेत. त्यामुळे लोकांना येण्या-जाण्यासाठी टॅक्सीचा आसरा घ्यावा लागणार. रिक्षा आणि टॅक्सीच्या बाबतील लोकांच्या अनेक तक्रारी आहेत. परिवहन विभागाच्या हेल्पलाइन नंबरवर येणाऱ्या तक्रारी गांभिर्याने घेणंही महत्त्वाचं आहे. 
 

Web Title: Odd-Eveen: These big challenges are being faced by the Delhi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.