आता 'आप' भाजपला थेट फाइट देणार, केजरीवालांनी वापरला मोदींचा 'विजयी फॉर्म्युला'; किती फायदा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 01:09 PM2023-12-01T13:09:18+5:302023-12-01T13:12:14+5:30

आता भाजपला त्यांच्याच अंदाजात उत्तर देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयाचा फॉर्म्युला वापरला आहे.

Now AAP will give a direct fight to BJP Delhi CM Arvind kejriwal adopts modi formula for campaign in delhi | आता 'आप' भाजपला थेट फाइट देणार, केजरीवालांनी वापरला मोदींचा 'विजयी फॉर्म्युला'; किती फायदा होणार?

आता 'आप' भाजपला थेट फाइट देणार, केजरीवालांनी वापरला मोदींचा 'विजयी फॉर्म्युला'; किती फायदा होणार?

दिल्लीतील दारू घोटाळ्याच्या आरोपांमुळे आम आदमी पक्ष सध्या गेल्या दहावर्षांतील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. एकीकडे मनिष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्यासारखे दिग्गज नेते कारागृहात आहेत. तर दुसरीकडे ज्यांच्या खांद्यावर संपूर्ण आपची धुरा आहे, अशा खुद्द अरविंद केजरीवाल यांच्यावरही तलवार लटकलेली आहे. मात्र आता, आम आदमी पक्षाने आलेल्या संकटाचं रुपांतर शक्तीत करण्यासाठी काम सुरू केले आहे. यावेळी भाजपला त्यांच्याच अंदाजात उत्तर देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयाचा फॉर्म्युला वापरला आहे.

गेल्या महिन्यात दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, अरविंद केजरीवाल, संबंधित नोटीस बेकायदेशीर असल्याचे म्हणत,  केंद्रीय तपास यंत्रणेला सामोरे गेले नाही. 

ही नोटीस मिळाल्यापासूनच आप आणि केजरीवाल स्वतः देखील सिसोदिया आणि संजय सिंह यांच्याप्रमाणेच आपल्यालाही अटक होऊ शकते, अशी भीती व्यक्त करत आहेत. ही भीती लक्षात घेऊनच 'आप'ने पुढील रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामुळे, केजरीवाल यांना तुरुंगात पाठवल्यास, त्यांनी राजीनामा द्यावा की तिहारमधूनच सरकार चालवावे, यासंदर्भात पक्षात विचार सुरू आहे. 

पंतप्रधान मोदींचा कोणता फॉर्मूला वापरला? -
केजरीवाल यांनी गेल्या काही दिवासांपूर्वी केलेल्या घोषणेनुसार, शुक्रवारपासून (एक डिसेंबर) आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये  'जनमत संग्रहा'ला सुरुवात केली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, 'मैं भी चौकीदार' घोषणेच्या धर्तीवर आम आदमी पक्षाने या अभियानाला 'मैं भी केजरीवाल' नाव दिले आहे. 

या अभियानांतर्गत दिल्लीतील सर्व 2600 बूथ साठी 2600 टीम तयार करण्यात आल्या आहेत. यात मंत्र्यापासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्व जण घरो-घरी जाणून केजरीवाल यांच्या राजीनाम्यासंदर्भात त्यांचे म्हणणे जाणून घेतील. तसेच त्यांना दारू घोटाळ्याचा आरोप, हे भाजपचे कटकारस्थान असल्याचेही सांगतील.

 

Web Title: Now AAP will give a direct fight to BJP Delhi CM Arvind kejriwal adopts modi formula for campaign in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.