...तर डिझेल 50 आणि पेट्रोल 55 रुपयांत मिळेल- गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 08:57 AM2018-09-11T08:57:40+5:302018-09-11T08:59:33+5:30

इंधनाचे दर कमी करण्यासाठी गडकरींनी सुचवला उपाय

Nitin Gadkari says Diesel for Rs 50 petrol Rs 55 possible as Centre plans to set up ethanol making plants | ...तर डिझेल 50 आणि पेट्रोल 55 रुपयांत मिळेल- गडकरी 

...तर डिझेल 50 आणि पेट्रोल 55 रुपयांत मिळेल- गडकरी 

Next

रायपूर: केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून देशात पाच इथेनॉल निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे डिझेल 50 आणि पेट्रोल 55 रुपये प्रति लिटर दरानं उपलब्ध होईल, असं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलमुळे इंधनाचे दर कमी होण्यास मदत होईल, असंदेखील गडकरी म्हणाले. ते छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात बोलत होते. 

डिझेल, पेट्रोल दरवाढीवरुन भाजपा ट्रोल; आकडेवारीचा आधार घेत काँग्रेसनं दाखवला आरसा

आपण तब्बल आठ लाख कोटी रुपयांचं पेट्रोल, डिझेल आयात करतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढतच आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी होत आहे. अशा परिस्थितीत इथेनॉल निर्मितीमुळे मोठा दिलासा मिळेल, असं गडकरी यांनी म्हटलं. 'मी गेल्या 15 वर्षांपासून देशातील शेतकरी, आदिवासींना इथेनॉल, मेथानॉल आणि जैव इंधनाच्या उत्पादनाचं महत्त्व सांगत आहे', याचीही आठवण त्यांनी करुन दिली. 

इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 14, तर डिझेल 15 पैशांनी महागलं

छत्तीसगडमध्ये जैव इंधनाचं केंद्र होण्याची क्षमता असल्याचं गडकरी म्हणाले. 'नागपुरात जवळपास एक हजार ट्रॅक्टर जैव इंधनावर चालतात. या क्षेत्रात आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आपण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून वाहन चालवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. अशा प्रयोगांना आणखी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. छत्तीसगड कृषी उत्पादनाच्या क्षेत्रात समृद्ध आहे. राज्यात गहू, तांदूळ, ऊस आणि डाळींचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे छत्तीसगड जैव इंधन निर्मितीत मोठी कामगिरी करु शकतं,' असं गडकरी म्हणाले. 

Web Title: Nitin Gadkari says Diesel for Rs 50 petrol Rs 55 possible as Centre plans to set up ethanol making plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.