एनआयए करणार बंगळुरूमधील स्फोटाचा तपास 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 08:40 AM2024-03-05T08:40:02+5:302024-03-05T08:40:35+5:30

डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर मास्क व गॉगल घातलेल्या एका व्यक्तीचे सीसीटीव्हीत चित्रण झाले असून तोच या प्रकरणातील संशयित आरोपी असल्याचे संशय आहे. 

NIA will investigate the explosion in Bangalore | एनआयए करणार बंगळुरूमधील स्फोटाचा तपास 

एनआयए करणार बंगळुरूमधील स्फोटाचा तपास 

नवी दिल्ली : बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमधील झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

१ मार्च रोजी झालेल्या या स्फोटात १० जण जखमी झाले होते. आवश्यकता वाटल्यास त्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सुपूर्द करण्याचा निर्णय कर्नाटक सरकार घेऊ शकते, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले होते.  या स्फोटाच्या तपासात एनआयएला कर्नाटक पोलिस, नॅशनल सिक्युरिटी ग्रुप (एनएसजी), इंटेलिजन्स ब्यूरो मदत करणार आहेत.

डोक्यावर टोपी, चेहऱ्यावर मास्क व गॉगल घातलेल्या एका व्यक्तीचे सीसीटीव्हीत चित्रण झाले असून तोच या प्रकरणातील संशयित आरोपी असल्याचे संशय आहे. 

Web Title: NIA will investigate the explosion in Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.