लग्न छोटं अन् कार्य मोठं, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले नवदाम्पत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 06:12 PM2018-08-20T18:12:58+5:302018-08-20T18:20:54+5:30

केरळमध्ये भीषण महापुराने थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले असून देशभरातून केरळसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने ही मदत करण्याचा प्रयत्न

Newly married couple appeal to to help kerala by flood, water and cloths | लग्न छोटं अन् कार्य मोठं, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले नवदाम्पत्य

लग्न छोटं अन् कार्य मोठं, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले नवदाम्पत्य

Next

कोची - केरळमध्ये भीषण महापुराने थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले असून देशभरातून केरळसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने ही मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच, 17 ऑगस्ट रोजी वजहुथाकॉड जिल्ह्यातील एका नवदाम्पत्याने लग्नात आहेर आणण्याऐवजी पूरग्रस्तांसाठी मदतीची साधनसामुग्री आणण्याचे आवाहन केले. या आवाहनला पाहुणेमंडळींनीही मोलाची साथ दिली.

केरळमध्ये गेल्या 8 दिवसांपासून भयावह पूरस्थिती निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत 350 पेक्षा अधिक नागरिकांना जीव गेला असून लाखो लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे देशभरातून केरळसाठी मदत करण्यात येत आहे. केरळच्या मुख्यमंत्री सहायता निधीत सर्वच स्तरातून मदत जमा होता आहे. क्रिकेटर, सेलिब्रिटी, राजकीय नेते, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकही आपले कर्तव्य समजून केरळसाठी मदत करत आहेत. त्यात, 17 ऑगस्ट रोजी तिरुवनंतरपूरम येथील जोडप्याने अगदी साधारण पद्धतीने आपले लग्न केले. केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हे कपल पुढे आले.  येथील वजहुथाकॉड जिल्ह्यातील शरथ एस नायर आणि श्रद्धा थंपी यांचा विवाह 17 ऑगस्ट रोजी पार पडला. या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांनी आहेर स्वरुन पूरग्रस्तांना आवश्यक ती साधनसामुग्री आणावी, असे आवाहन या जोडप्याने केले होते. त्यासाठी, शरथ नायर यांनी लग्नाला येणाऱ्या मित्र आणि पाहुण्यांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवलि होता. त्याद्वारे सर्वांना मदतीचे आवाहन केले. तसेच लग्नात सहभागी झालेल्या लोकांसमोरही शरथ यांनी पुन्हा या मदतीची घोषणा केली. त्यानंतर, लोकांनीही शरथच्या आवाहनाला दाद देत, पैशांऐवजी, जेवण, पाण्याच्या बाटल्या, कपडे, धान्य, बिस्किटे आणि मेडिसीन असे साहित्य जमा केले. तर, शरथने वेकअप केरळ या सोशल मीडियावरील ग्रुपच्या माध्यमातून हे साहित्य पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवले. दरम्यान, शरथ हा एका खासगी कंपनीत प्रोडक्शन मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. शरथ ने सोशल मीडियाद्वारे पूरग्रस्तांना हवे असलेल्या साधनसामुग्रीची माहिती घेतली.  
 

Web Title: Newly married couple appeal to to help kerala by flood, water and cloths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.