बिहारच्या पुरात एनडीआरफ जवानांनी वाचवले 102 गर्भवती महिलांचे प्राण, तीन महिलांची बोटीतच प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2017 10:30 AM2017-09-09T10:30:20+5:302017-09-09T10:35:34+5:30

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे.

NDRF jawans saved lives of 101 pregnant women in three years | बिहारच्या पुरात एनडीआरफ जवानांनी वाचवले 102 गर्भवती महिलांचे प्राण, तीन महिलांची बोटीतच प्रसूती

बिहारच्या पुरात एनडीआरफ जवानांनी वाचवले 102 गर्भवती महिलांचे प्राण, तीन महिलांची बोटीतच प्रसूती

Next
ठळक मुद्देएनडीआरएफ जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेतविशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे 'एका बाळाचा जन्म 16 ऑगस्ट रोजी मधुबनी येथे, दुस-याचा 18 ऑगस्ट रोजी गोपालगंज येथे आणि तिस-याचा 23 ऑगस्ट रोजी मोतिहारी येथे झाला'एनडीआरएफच्या एकूण 28 टीम असून, त्यांनी आतापर्यंत 48 हजार 486 जणांची सुटका केली आहे. तसंच 29 जनावरांना सुरक्षितस्थळी पोहोचवलं आहे

पाटणा, दि. 9 - राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे. एनडीआरएफच्या नवव्या बटालिययने दिलेल्या माहितीनुसार, 'त्या तीन महिलांची डिलिव्हरी व्यवस्थित व्हावी यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी मदत केली'.

एनडीआरएफ अधिकारी विजय सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका बाळाचा जन्म 16 ऑगस्ट रोजी मधुबनी येथे, दुस-याचा 18 ऑगस्ट रोजी गोपालगंज येथे आणि तिस-याचा 23 ऑगस्ट रोजी मोतिहारी येथे झाला'.

एनडीआरएफ टीमने आतापर्यंत 102 गर्भवती महिलांची पुरातून सुटका केली असून, त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. एनडीआरएफच्या एकूण 28 टीम असून, त्यांनी आतापर्यंत 48 हजार 486 जणांची सुटका केली आहे. तसंच 29 जनावरांना सुरक्षितस्थळी पोहोचवलं आहे. एनडीआरएफचं वैद्यकीय पथकदेखील पुरग्रस्त भागात जाऊन गरजूंची मदत करत आहे. यासाठी रिव्हर अॅम्ब्युलन्सची मदत घेतली जात आहे. 

बिहारमधील महानंदा, कंकई आदी नद्यांना पूर आला असून चार जिल्ह्यात पूरस्थिती आहे. राज्यातील २० लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. नेपाळ आणि सिमावर्ती भागातील पावसामुळे बिहारमधील नद्यांना पूर आला आहे. राष्ट्रीय आपत्कालिन विभागाच्या दहा तुकड्या देण्याची मागणी नितीशकुमार यांनी केली होती. याशिवाय हवाई दलाचे हेलिकॉप्टर मदतीसाठी देण्याची मागणी करण्यात आली होती. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन केंद्राकडून सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन होते. बिहारला 500 कोटींची मदत देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारातील पूरस्थितीची हवाई पाहणी केली, तसेच पूरग्रस्त भागाला ५00 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. पुरात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसाठी २ लाख रुपयांचे, तर गंभीर जखमींना ५0 हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक बिहारला पाठविण्यात येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकºयांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी विमा कंपन्यांनी लवकरात लवकर प्रतिनिधी पाठवून नुकसानीचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मोदी यांनी बिहारातील चार जिल्ह्यांतील पूरस्थितीची हवाई पाहणी केली. त्यात पुर्णिया, कटिहार, किशनगंज, अरारिया यांचा समावेश होता. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हेही त्यांच्यासोबत होते.

पंतप्रधानांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिहारातील १९ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. त्यातील १३ जिल्ह्यांत नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. राज्याच्या जलस्रोत विभागाला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे. नद्यांच्या काठांवर उभारण्यात आलेले कोट आणि सिंचन कालवे वाहून गेले आहेत. त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी २,७00 कोटी रुपये लागतील. पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. आतापर्यंत २ हजार कोटी रुपयांचे मदत साहित्य पूरग्रस्तांना वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली होती.

Web Title: NDRF jawans saved lives of 101 pregnant women in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.