धावत्या रेल्वेतून माय-लेकींनी घेतली उडी    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:46 PM2017-11-13T23:46:38+5:302017-11-13T23:46:38+5:30

कोलकात्याहून दिल्लीला जाणारी एक ४० वर्षीय महिला आणि तिच्या १५ वर्षीय मुलीने कानपूरजवळ धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली. या रेल्वेतील १० ते १५ जणांच्या टोळक्याने या तरुणीशी छेडछाड करत तिला टॉयलेटमध्ये ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घाबरलेल्या या माय-लेकींनी धावत्या रेल्वेतून उडी मारली. यात त्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर लाला लजपतराय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  

Myelike took a jump from the running train | धावत्या रेल्वेतून माय-लेकींनी घेतली उडी    

धावत्या रेल्वेतून माय-लेकींनी घेतली उडी    

Next
ठळक मुद्देटोळक्याकडून मुलीवर बलात्काराचा प्रयत्न      


कानपूर : कोलकात्याहून दिल्लीला जाणारी एक ४० वर्षीय महिला आणि तिच्या १५ वर्षीय मुलीने कानपूरजवळ धावत्या रेल्वेतून उडी मारल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली. या रेल्वेतील १० ते १५ जणांच्या टोळक्याने या तरुणीशी छेडछाड करत तिला टॉयलेटमध्ये ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घाबरलेल्या या माय-लेकींनी धावत्या रेल्वेतून उडी मारली. यात त्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर लाला लजपतराय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.     


याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. रेल्वेतून उडी मारल्यानंतर या माय-लेकी तब्बल दोन तास बेशुद्ध होत्या. चांदरी रेल्वेस्टेशनवरील नागरिकांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. या महिलेचे पती दिल्लीत एका खासगी कंपनीत काम करतात. त्यांना भेटण्यासाठी या दोघी दिल्लीला जात होत्या. या महिलेने पोलिसांना सांगितले की, हावडा स्टेशन सोडल्यानंतर या टोळक्याने मुलीला त्रास देण्यास आणि छेडछाड करण्यास सुरुवात केली. याची तक्रार पोलिसांना केली. कॉन्स्टेबलने यातील तिघांना पकडले. मात्र, अर्ध्या तासात हे तिघे पोलिसांना लाच देऊन परत आले, असा आरोप या महिलेने केला आहे. 


अलाहाबाद सोडल्यानंतर या टोळक्याने जास्त त्रास देण्यास सुरुवात केली. या मुलीची विक्री करण्याचीही धमकी त्यांनी दिली. रात्री १० च्या सुमारास ही मुलगी टॉयलेटकडे जात असताना चार ते पाच जणांनी तिच्यावर झडप घातली. मुलगी ओरडल्यानंतर आई धावत आली आणि या लोकांपासून स्वत:ची सुटका करून घेत या माय-लेकींनी रेल्वेतून उडी मारली. 

          

         

Web Title: Myelike took a jump from the running train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.