मुजफ्फरपूर शेल्टर होम प्रकरण: माजी मंत्री दामोदर रावत यांची सीबीआयनं केली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 01:02 PM2018-08-20T13:02:34+5:302018-08-20T13:02:42+5:30

बिहारमधलं बहुचर्चित मुजफ्फरपूरमध्ये बालिका गृह प्रकरणात आता सीबीआयनं कारवाईला सुरुवात केली आहे.

Muzaffarpur Shelter Home Case: CBI probe by former minister Damodar Rawat | मुजफ्फरपूर शेल्टर होम प्रकरण: माजी मंत्री दामोदर रावत यांची सीबीआयनं केली चौकशी

मुजफ्फरपूर शेल्टर होम प्रकरण: माजी मंत्री दामोदर रावत यांची सीबीआयनं केली चौकशी

पाटणा- बिहारमधलं बहुचर्चित मुजफ्फरपूरमध्ये बालिका गृह प्रकरणात आता सीबीआयनं कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणात सीबीआयनं बिहारचे माजी मंत्री दामोदर रावत यांना काही प्रश्न विचारले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात सीबीआयनं बिहार सरकारमधले तत्कालीन माजी समाजकल्याण मंत्री दामोदर रावत यांची जवळपास 5 तास चौकशी केली. 

सीबीआयनं माहिती विभागाकडून मिळवलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर पुराव्यांच्या आधारे माजी मंत्री रावत यांना विचारणा करण्यात आली. रावत यांनी त्यांच्या लावण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरणही दिलं आहे. तसेच ब्रजेश ठाकूर यांच्याशी माझे व मुलाचे कोणतेही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ब्रजेश ठाकूरशी मी आणि माझा मुलगा कधीही भेटलेलो नाही.



रावत हे एप्रिल 2008 ते 2010पर्यंत बिहारमध्ये समाजकल्याण मंत्री होते. रावत यांच्या चौकशीत सीबीआयच्या हाती बालिका गृहकांडासंदर्भात महत्त्वाचे धागेदोरे लागण्याची माहिती समोर येत आहे. तत्पूर्वी जेडीयूनं दामोदर रावत यांचे पुत्र राजीव रावत याला जेडीयूतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.  

Web Title: Muzaffarpur Shelter Home Case: CBI probe by former minister Damodar Rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.