माता न तू वैरिणी ! मुलाच्या हव्यासापोटी तीन महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 11:09 AM2017-12-05T11:09:58+5:302017-12-05T12:02:30+5:30

आपल्याच पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. गाजियाबादमधील पाटला शहरात ही धक्कायदाक घटना घडली आहे.

mother killed three month daughter for son | माता न तू वैरिणी ! मुलाच्या हव्यासापोटी तीन महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या

माता न तू वैरिणी ! मुलाच्या हव्यासापोटी तीन महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या

Next
ठळक मुद्देआपल्याच पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी महिलेला अटकमुलगा झाला नाही या रागातून महिलेने आपल्या तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याची पोलिसांची माहितीपोलिसांनी महिलेला अटक केली आहे

गाजियाबाद - आपल्याच पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. गाजियाबादमधील पाटला शहरात ही धक्कायदाक घटना घडली आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे, मुलगा झाला नाही या रागातून महिलेने आपल्या तीन महिन्याच्या मुलीची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. 

'आरती या महिलेने तीन महिन्यांपुर्वी एका मुलीला जन्म दिला होता. मुलगा न झाल्याने तिची प्रचंड चिडचिच होत होती. तिला स्वत:चा राग येत होता', अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधीक्षक आकाश तोमर यांनी दिली आहे. 

'रविवारी महिलेने उशीच्या सहाय्याने मुलीचं तोंड दाबून हत्या केली. यानंतर तिचा मृतदेह वॉशिंग मशिनमध्ये लपवून ठेवला होता', असं आकाश तोमर यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'सुरुवातीला महिलेने आपल्या मुलीचं अपहरण झाल्याचा दावा केला होता. पण कसून चौकशी केल्यानंतर आपणच आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली तिने दिली'. 

महिलेच्या कुटुंबाने आपण कधीही मुलासाठी तिच्यावर दबाव टाकला नसल्याचा दावा केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून, तपास सुरु आहे. 

आईनेच चार वर्षाच्या मुलीली दिली गरम तव्यावर बसण्याची शिक्षा
आईने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलीला गरम तव्यावर बसण्याची शिक्षा दिली असल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली होती. हैदराबादमधील एसआर नगरमध्ये ही घटना होती. यानंतर आई व तिच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. ललिता व तिचा साथीदार एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करतात. ललिता स्वयंपाकी म्हणून काम करते तर तिचा साथीदार वॉचमनचं काम करतो. हॉस्टेलमध्ये खेळतं असताना मुलीकडून एका व्यक्तीच्या लॅपटॉपचं नुकसान झालं. त्या व्यक्तीने याबद्दलची ललिताकडे तक्रार केल्यावर ललिताने चिमुरडीला मारहाण केली. पीडित मुलीला इजा झाली असून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 
 

Web Title: mother killed three month daughter for son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.