धक्कादायक ! चार मुलींसोबत आईला चालत्या ट्रेनमधून फेकलं, आई आणि एका मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 09:03 PM2017-10-25T21:03:47+5:302017-10-25T21:04:21+5:30

मुलींसोबत त्यांच्या आईलाही चालत्या ट्रेनमधून फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सितापूरमधील अमृतसर येथून सहरसा येथे जाणा-या जनसेवा एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली होती.

Mother along with four girls threw off a moving train, mother and daughter's death | धक्कादायक ! चार मुलींसोबत आईला चालत्या ट्रेनमधून फेकलं, आई आणि एका मुलीचा मृत्यू

धक्कादायक ! चार मुलींसोबत आईला चालत्या ट्रेनमधून फेकलं, आई आणि एका मुलीचा मृत्यू

Next

लखनऊ - मुलींसोबत त्यांच्या आईलाही चालत्या ट्रेनमधून फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सितापूरमधील अमृतसर येथून सहरसा येथे जाणा-या जनसेवा एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली होती. आरोपीने चार मुलींसोबत त्यांच्या आईलाही ट्रेनमधून खाली फेकल्याने खळबळ माजली होती. यामागे त्यांच्या वडिलांचा किंवा मामाचा हात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप कोणतेही पुरावे हाती लागलेले नाहीत. घटनेत महिलेचा आणि तिच्या एका मुलीचा मृत्यू झाला आहे. 

मंगळवारी रामकोट क्षेत्रात गोरा गावाजवळ सात वर्षीय अल्बतुम आणि पाच वर्षीय सलीमा खातून जखमी अवस्थेत सापडल्या होत्या. तर काही अंतरावर तिसरी बहिण मुन्नी खातून हिचा मृतदेह आढळला होता. 

याच रेल्वे लाइनवर महूदाबाद क्षेत्रात अजून एक मुलगी जखमी अवस्थेत आढळली होती. पोलिसांनी तिला लखनऊमधील ट्रॉमा सेंटरमध्ये भर्ती केलं होतं. बुधवारी तिची ओळख पटली तेव्हा ती सर्वात मोठी बहिण रबीना असल्याचं समजलं. रबीनाच्या चेहरा आणि डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. 

मंगळवारी रात्री शुद्धीवर आल्यानंतर अल्बतुमने पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या मामा इकबालने त्यांना ट्रेनमधून ढकललं होतं. आम्ही सर्वजणी लुधियानात भीक मागायचो असंही तिने सांगितलं आहे. मिळालेले सर्व पैसे वडिलांना देत असू असंही तिने सांगितलं. 

आम्ही दिलेले पैसे वडिल दारुत उडवत असत. आमचा मामाही आमच्यासोबत राहत असे अशी माहिती मुलींनी दिली आहे. मुलींचा जबाब नोदवल्यानंतर पोलिसांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. जखमी मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी महिला पोलिसांना तैनात केलं आहे. 

मैंगलगंज परिसरातून आईचा मृतदेह ताब्यात
मंगळवारी सकाळी लखीमपूर जिल्ह्यातील मैंगलगंज येथील रेल्वे रुळावर एका महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी महिलेचा फोटो दाखवला असता, मुलींनी ती आपली आई आफरीना खातून असल्याचं सांगितलं. पोलीस सध्या घटनेचा तपास करत आहेत. मुलींच्या वडिलांनीच हत्या करण्याच्या उद्देशाने त्यांना ट्रेनमधून ढकललं असल्याचा अंदाज आहे. दरम्यान मुलींचा मामा घटनेनंतर फरार आहे. 
 

 

Web Title: Mother along with four girls threw off a moving train, mother and daughter's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.