मोदींच्या फॉलोअर्समध्ये एका वर्षात 51 टक्क्यांनी वाढ, पंतप्रधान सोशल मीडियावर हिट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 09:06 AM2017-12-05T09:06:58+5:302017-12-05T12:31:12+5:30

ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे.

Modi's Followers Increased by 51% in One-Year, Prime Minister Hit On Media | मोदींच्या फॉलोअर्समध्ये एका वर्षात 51 टक्क्यांनी वाढ, पंतप्रधान सोशल मीडियावर हिट

मोदींच्या फॉलोअर्समध्ये एका वर्षात 51 टक्क्यांनी वाढ, पंतप्रधान सोशल मीडियावर हिट

Next
ठळक मुद्दे ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. नरेंद्र मोदी यांना आता 37.5 कोटी युजर्स ट्विटरवर फॉलो करतात. मोदींच्या फॉलोअर्सच्या संख्येत 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

मुंबई- ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर सगळ्यात जास्त फॉलो करणारा भारतीय व्यक्ती बनल्याच्या एका वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता 37.5 कोटी युजर्स ट्विटरवर फॉलो करतात. गेल्या एक वर्षात जीएसटी, मन की बात, राष्ट्रपती निवडणूक आणि नोटाबंदीची वर्षपूर्ती असे हॅशटॅग टेंड्रिंग असतानाही मोदींच्या फॉलोअर्सच्या संख्येत 51 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

2017मध्ये सगळ्यात जास्त चर्चेच्या विषयांवर विचारला असता, ट्विटर इंडियाचे तरनजीत सिंह म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची नंबर एकची जागा अजूनही कायम ठेवली आहे. मोदींबरोबर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे क्रिकेट स्टार टॉप 10 लिस्टमध्ये आहेत. विशेष म्हणजे टॉप 10 च्या या यादीतून अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि ए.आर रहमान हे कलाकार बाहेर गेले आहेत. अभिनेता अक्षय कुमारच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली असून त्याने 2017मध्ये आमिर खानला मागे टाकलं आहे.

दुसरीकडे, दाक्षिणात्य सिनेमाचे सुपरस्टार सुर्या शिवकुमार यांचं त्यांचा सिनेमा 'थाना सेरंधा कूटम'च्य दुसऱ्या लूकचं ट्विट वर्षात सगळ्यात चर्चेत राहिलं. या ट्विटला या वर्षात सगळ्यात जास्त रिट्विट मिळाले आहेत. तसंच यावर्षात ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय सगळ्यात जास्त चर्चित विषय होता. #Triple Talaq 22 ऑगस्ट 2017 पासून ट्रेंण्ड व्हायला सुरू झालं आणि त्याबरोबर 3 लाख 50 हजार ट्विट केले गेले. याशिवाय जीएसटी, डेरा सच्चा सौदाचा राम रहीमही बराच चर्चेत राहीला. गेल्यावर्षी ट्रेण्डमध्ये असलेला नोटाबंदीचा मुद्दा यावर्षही तितकाच चर्चेत राहीला. 

Web Title: Modi's Followers Increased by 51% in One-Year, Prime Minister Hit On Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.