मोदी परदेशात जातात, पण इथल्या लोकांना भेटणे टाळतात, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 03:13 PM2019-03-29T15:13:22+5:302019-03-29T15:17:43+5:30

सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.

Modi visited whole world & hugged everyone, but didn't hug his own ppl - Priyanka Gandhi | मोदी परदेशात जातात, पण इथल्या लोकांना भेटणे टाळतात, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

मोदी परदेशात जातात, पण इथल्या लोकांना भेटणे टाळतात, प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Next

अयोध्या - सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगभर फिरतात. अनेकांच्या गळाभेटी घेतात. पण आपल्याच लोकांना भेटणे मात्र टाळतात, असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला आहे.

अमेठी आणि रायबरेली या गांधी कुटुंबीयांच्या पारंपरिक मतदारसंघांच्या दौरा केल्यानंतर प्रियंका गांधी यांनी आज अयोध्येला भेट दिली. यावेळी प्रियंका गांधी यांनी स्थानिक मतदारांशी संवाद साधला. त्या म्हणल्या, आज या देशात जनतेचे दु:ख ऐकण्यासाठी कुणीही नाही. देशातील तरुण बेरोजगार होऊन फिरत आहेत. सध्या सत्तेवर असलेल्या मोदी सरकार एवढे दुबळे सरकार मी आजपर्यंत पाहिले नाही.'' 
 यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवरही प्रियंका गांधी यांनी टीका केली. ''वाराणसीच्या गावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात का असे जेव्हा मी स्थानिकांका विचारले तेव्हा त्यांनी नाही असे उत्तर दिले. हे ऐकून मला धक्का बसला. मला वाटले होते यांनी काही तरी केले असेल. पण हे पूर्ण जग फिरतात. अनेकांची गळाभेट घेतात. मात्र आपल्याच लोकांनी त्यांनी भेट घेतलेली नाही."





 भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार खोटारडे असल्याचा आरोपही त्यांनी केला. ''भाजपा सरकार खोटेपणा आणि प्रचारावर उभे आहे. तिथे जनतेचे दु:ख ऐकणारा कुणी नाही. देशातील तरुण बेरोजगार झाले आहेत. शेतकऱ्यांना मनरेगाचे पैसे सहा सहा महिन्यांपर्यंत मिळत नाही. हे सर्व जाणूनबुजून केले जात आहे. कारण मनरेगाला बंद करण्याची त्यांची इच्छा आहे. तसेच भाजपाच्या राज्यात जनतेचा आवाज दाबला जात आहे.'' असेही प्रियंका गांधी म्हणाल्या. 



 

Web Title: Modi visited whole world & hugged everyone, but didn't hug his own ppl - Priyanka Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.