जाहिरातीबाजीवर मोदी सरकारने खर्च केले 4343 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 04:43 PM2018-05-14T16:43:28+5:302018-05-14T16:43:28+5:30

जाहिरातबाजीवर पैशाच्या होणाऱ्या उधळपट्टीबाबत चोहोबाजूंनी टीकेनंतर यावर्षी खर्चात 25 टक्यांची कपात करत मोदी सरकारने 308 कोटी गत वर्षाच्या तुलनेत कमी खर्च केले आहे.

Modi government spend 4343 crore on advertisement | जाहिरातीबाजीवर मोदी सरकारने खर्च केले 4343 कोटी

जाहिरातीबाजीवर मोदी सरकारने खर्च केले 4343 कोटी

googlenewsNext

पंतप्रधान बनतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बनलेल्या मोदी सरकारने गेल्या 46 महिन्यात सर्वप्रकारच्या जाहिरातीबाजीवर 4343.26 कोटी खर्च केले असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ आऊटरिच एंड कम्युनिकेशन खात्याने दिली आहे. जाहिरातबाजीवर पैशाच्या होणाऱ्या उधळपट्टीबाबत चोहोबाजूंनी टीकेनंतर यावर्षी खर्चात 25 टक्यांची कपात करत मोदी सरकारने 308 कोटी गत वर्षाच्या तुलनेत कमी खर्च केले आहे.


आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केंद्र सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत विविध जाहिरातीवर झालेल्या खर्चाची माहिती मागितली होती. केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ आऊटरिच एंड कम्युनिकेशन खात्याचे वित्तीय सल्लागार तपन सुत्रधर यांनी अनिल गलगली यांस 1 जून 2014 पासूनची माहिती उपलब्ध करुन दिली आहे. यात 1 जून 2014 पासून 31 मार्च 2015 या कालावधीत 424.85 कोटी प्रिंट मीडिया, 448.97 कोटी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि 79.72 कोटी बाह्य प्रचारावर खर्च केले आहे. वर्ष 2015-2016 या आर्थिक वर्षात 510.69 कोटी प्रिंट मीडिया, 541.99 कोटी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि 118.43 कोटी बाह्य प्रचारावर खर्च केले आहे. वर्ष 2016-2017 या आर्थिक वर्षात 463.38 कोटी प्रिंट मीडिया, 613.78 कोटी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि 185.99 कोटी बाह्य प्रचारावर खर्च केले आहे. 1 एप्रिल 2017 पासून 7 डिसेंबर 2018 कालावधीत 333.23 कोटी प्रिंट मीडियावर खर्च केले. 1 एप्रिल 2017 पासून 31 मार्च 2018 या कालावधीत इलेक्ट्रॉनिक मीडियावर 475.13 कोटी खर्च केले आणि बाह्य प्रचारात 147.10 कोटी हे 1एप्रिल 2017 पासून 31 जानेवारी 2018 पर्यंत खर्च करण्यात आले आहे.

विरोधी पक्ष आणि सोशल मीडियावर जनतेचा पैसा जाहिरातीबाजीवर कशा उधळला जातो यावर सडकून झालेल्या टीकेनंतर कदाचित मोदी सरकारने वर्ष 2017-18 या आर्थिक वर्षात खर्चात कपात केली असल्याची बाब समोर आली आहे. वर्ष 2016-17 आर्थिक वर्षात एकूण 1263.15 कोटी खर्च करणाऱ्या सरकारने वर्ष 2017-2018 या आर्थिक वर्षात 955.46 कोटी खर्च केले आहे. 308 कोटी कमी खर्च करत जवळपास 25 टक्क्यांची कपात केली गेली आहे.अनिल गलगली यांच्या मते आवश्यक जाहिरात करणे अपेक्षित आहे पण कधी-कधी अनावश्यक जाहिरातबाजी करत जनतेच्या पैश्याची उधळपट्टी केली जात असून एकूणएक खर्चाची इत्यंभूत माहिती संकेतस्थळावर प्रकाशित करणे आवश्यक आहे.

Web Title: Modi government spend 4343 crore on advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.