मोदी सरकारमुळे बेकारी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 05:00 AM2019-07-12T05:00:53+5:302019-07-12T05:01:06+5:30

पी. चिदम्बरम : धाडसी निर्णय घेण्यास टाळाटाळ

The Modi government has created unemployment | मोदी सरकारमुळे बेकारी वाढली

मोदी सरकारमुळे बेकारी वाढली

Next

नवी दिल्ली : देशात बेकारीच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्याचे बोलके उदाहरण म्हणजे मध्यंतरी खलाशांच्या ६२,९०७ जागांच्या भरतीसाठी ८२ लाख उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यातील ४,१९,१३७ जण बीटेक पदवीधर तर ४०,७५१ जणांनी इंजिनिअरिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते अशी माहिती माजी केंद्रीय वित्तमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी दिली आहे.


केंद्रीय अर्थसंकल्पावर राज्यसभेतील चर्चेत ते बोलत होते. चिदम्बरम म्हणाले की, अशी अर्थव्यवस्था या सरकारच्या कृपेने आपल्याला वारशाने मिळाली आहे. त्यासाठी तिला दोष देण्यात अर्थ नाही. ही वस्तुस्थिती जाणून खरेतर मोदी सरकारने सतर्क राहायला हवे. मात्र या सरकारने डोळ््यासमोर ठेवलेले ध्येय वेगळेच आहे.


मोदी सरकार निर्णय का घेत नाही?
लोकसभेत भाजपचे ३०३ खासदार निवडून आले. मनमोहनसिंग व मी या विषयावर चर्चा केली. अशा प्रकारचे ध्येय मनमोहनसिंग यांनी आयुष्यात कधीतरी उराशी बाळगायला हवे होते अशी इच्छा मी व्यक्त केली असे उपरोधिक शैलीत पी. चिदम्बरम यांनी म्हटले आहे.
एनडीए व त्यातील घटकपक्षांचे ३५२ खासदार आता लोकसभेत आहेत. असे असूनही अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदी सरकार धाडसी निर्णय का घेत नाही, असा सवालही चिदम्बरम यांनी विचारला.

Web Title: The Modi government has created unemployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.