2002 गुजरात दंगलीची चौकशी करणा-या मोदींची एनआयए महासंचालकपदी नियुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 05:54 PM2017-09-18T17:54:46+5:302017-09-18T18:01:39+5:30

सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात (एसआयटी) त्यांचा समावेश होता, विशेष म्हणजे 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीची त्यांनी चौकशी केली होती.  

Modi appointed NIA Director General of 2002 Gujarat riots | 2002 गुजरात दंगलीची चौकशी करणा-या मोदींची एनआयए महासंचालकपदी नियुक्ती 

2002 गुजरात दंगलीची चौकशी करणा-या मोदींची एनआयए महासंचालकपदी नियुक्ती 

Next

नवी दिल्ली, दि. 18 - ज्येष्ठ आयपीएस अधिकारी वाय.सी.मोदी यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या(एनआयए) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विदयमान महासंचालक शरद कुमार यांचा कार्यकाळ  30 अक्टूबर 2017 रोजी संपणार आहे. कुमार निवृत्त झाल्यानंतर  वाय.सी.मोदी महासंचालकपदाचा कार्यभार सांभाळतील. 


सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात (एसआयटी) त्यांचा समावेश होता, विशेष म्हणजे 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीची त्यांनी चौकशी केली होती.  सीबीआयचे विशेष संचालक म्हणून ते सध्या काम पाहात आहेत.  


1984 च्या आसाम-मेघालय बॅचचे आयपीएस अधिकारी म्हणूनही मोदींची ओळख आहे. जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी गटांकडून वाढत्या कुरापती आणि दगडफेकीची एनआयए चौकशी करत असताना मोदी यांची महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे हे विशेष. 
 

Web Title: Modi appointed NIA Director General of 2002 Gujarat riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.