आधुनिक महाभारत : जुगारात गमावली पत्नी, दोन मुले, पंचायतीनेही सांगितले एक तरी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 03:09 AM2018-03-28T03:09:43+5:302018-03-28T03:09:43+5:30

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर शहरातील मोहसिन नावाच्या एका इसमाने जुगारात पत्नी आणि दोन मुले पणाला लावली आणि तिघांनाही गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Modern Mahabharata: Give a wife, two children lost in gambling, even a Panchayat! | आधुनिक महाभारत : जुगारात गमावली पत्नी, दोन मुले, पंचायतीनेही सांगितले एक तरी द्या!

आधुनिक महाभारत : जुगारात गमावली पत्नी, दोन मुले, पंचायतीनेही सांगितले एक तरी द्या!

Next

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर शहरातील मोहसिन नावाच्या एका इसमाने जुगारात पत्नी आणि दोन मुले पणाला लावली आणि तिघांनाही गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौरवांशी द्युत खेळताना सर्व राज्य हरल्यावर पांडवांनी पत्नी पांचाली हिचीही बाजी लावल्याने घडलेले महाभारत सर्वश्रुत आहे. तिथे पांचालीने तक्रार केली नव्हती आणि ती करायला, तेव्हा न्यायालयेही नव्हती. बुलंदशहरमधील हे आधुनिक महाभारत मात्र मोहसिनच्या पत्नीने तेथील न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल
केल्यावर तब्बल दोन वर्षांनी उघड झाले.
पोलिसांकडे तक्रार करूनही त्यांनी काही केले नाही, म्हणून पत्नीने ही फिर्याद दाखल केली. त्यावर दंडाधिकाºयांनी आरोपींवर गुन्हे नोंदविण्याचा आदेश दिला असून, पोलीस आता फरार आरोपींचा शोध घेत आहेत. या महिलेने जुगारी मोहसिनला घटस्फोट देऊन चंदोरा गावातील एका तरुणाशी विवाह केला आहे.  

या महिलेने फिर्यादीत दिलेली माहिती संतापजनक आहे. सन २०१२ मध्ये तिचे मोहसिनशी लग्न झाले व दोन वर्षांत दोन मुले झाली. सन २०१५ मध्ये इमरान नावाच्या इसमासोबत जुगार खेळताना, मोहसिनने पत्नी व दोन्ही मुलांची बाजी लावली व तो त्यात हरला.
त्यानंतर, इमरान मोहसिनच्या घरी आला आणि त्याच्या जुगारात ‘जिंकलेल्या’ पत्नीला बळजबरीने सोबत नेऊ लागला. तिने आरडाओरडा करून विरोध केल्यावर गावाची पंचायत बसली व निदान एका मुलाला तरी इमरानकडे सोपवावेच लागेल, असा फैसला पंचांनी दिला. त्यानुसार, मोहसिनच्या एका मुलाला इमरान घेऊन गेला.

Web Title: Modern Mahabharata: Give a wife, two children lost in gambling, even a Panchayat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.