आमदार, खासदारांची जीभ छाटू, पोलीस अधिकाऱ्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 05:01 AM2018-09-23T05:01:34+5:302018-09-23T05:02:06+5:30

आतापर्यंत आजी-माजी आमदार, खासदारांचे आम्ही फार ऐकून घेतले. पण यापुढे आमच्याविषयी अपशब्द काढणाºया आमदार-खासदारांची जीभच छाटू, अशी धमकी आंध्र प्रदेशातील एका पोलीस अधिका-याने दिली आहे.

MLAs, MPs' tongue threatens | आमदार, खासदारांची जीभ छाटू, पोलीस अधिकाऱ्याची धमकी

आमदार, खासदारांची जीभ छाटू, पोलीस अधिकाऱ्याची धमकी

Next

अमरावती - आतापर्यंत आजी-माजी आमदार, खासदारांचे आम्ही फार ऐकून घेतले. पण यापुढे आमच्याविषयी अपशब्द काढणाºया आमदार-खासदारांची जीभच छाटू, अशी धमकी आंध्र प्रदेशातील एका पोलीस अधिका-याने दिली आहे.
या धमकीनंतर तेलगू देसमचे खासदार जे. सी. दिवाकर रेड्डी यांनी या पोलीस अधिकाºयाला उद्देशून, मी आव्हान स्वीकारायला तयार आहे. तुम्ही सांगाल तेथे मी येतो, तुमच्या घरी येऊ की गावात येऊ , ते मला सांगा, असे पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांनी ताडीपत्री पोलीस ठाण्यात या अधिकाºयाविरुद्ध तक्रारही दाखल केली. पण त्याआधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला नसून, खा. रेड्डी यांच्या तक्रारीची नोंद अदखलपात्र गुन्हा अशीच केली आहे.
एका गावात दोन गटांत या आठवड्यात दंगल झाली होती. त्यावेळी सारे पोलीस शेपूट लावून पळून गेले, असा आरोप खा. रेड्डी यांनी केला होता. आपणही तेथे उपस्थित होतो. पण पोलीसच शेपूट लावून पळून गेल्याने मलाही स्वत:ला वाचवण्यासाठी तेथून पळ काढावा लागला, असेही त्यांनी म्हटले
होते. (वृत्तसंस्था)

नाराजी, पण बोलण्यास नकार

पोलीस अधिकारी माधव यांच्या या धमकीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अनंतपुरम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी. व्ही. अशोककुमार यांनी याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला. पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी सांगितले की, खा. रेड्डी यांनी केलेल्या तक्रारीची माहिती आम्ही वरिष्ठांना दिली आहे. त्यांच्याकडून जे मार्गदर्शन होईल, त्याप्रमाणे आपण कारवाई करू.

Web Title: MLAs, MPs' tongue threatens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.