Mizoram Assembly Election Results : मिझो नॅशनल फ्रंटला स्पष्ट बहुमत, काँग्रेसला जनतेनं नाकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 11:25 AM2018-12-11T11:25:43+5:302018-12-11T11:37:49+5:30

मिझोरम विधानसभा निवडणूक 2018 : मिझोरम (Mizoram Assembly Elections 2018) विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार

mizoram election results 2018 mizoram congress will go behind mnf will get most seats | Mizoram Assembly Election Results : मिझो नॅशनल फ्रंटला स्पष्ट बहुमत, काँग्रेसला जनतेनं नाकारलं

Mizoram Assembly Election Results : मिझो नॅशनल फ्रंटला स्पष्ट बहुमत, काँग्रेसला जनतेनं नाकारलं

Next
ठळक मुद्देमिझोरम (Mizoram Assembly Elections 2018) विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. मिझोरममध्ये काँग्रेसला पछाडत मिझो नॅशनल फ्रंट आघाडीवर आहे. मिझोरममधल्या मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - मिझोरम (Mizoram Assembly Elections 2018) विधानसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार आहे. मिझोरममध्ये काँग्रेसला पछाडत मिझो नॅशनल फ्रंट आघाडीवर आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) ला स्पष्ट बहुमत दिसत असून ते 28 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 8 जागांवर आहे.

मिझोरममध्ये राज्यातील 40 जागांवर आज मतमोजणी होत आहे. मिझोरममधल्या मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जेणेकरून मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. एक्झिट पोलनुसार मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंट (Mizo National Front) म्हणजेच एमएनएफ सत्ता हस्तगत करण्याची शक्यता आहे.



निवडणुकीत मिझोरम पीपल्स कान्फरन्स,  मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, मुख्य लढत मिझो नॅशनल फ्रंट आणि काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. मिझोरममध्ये 40 जागांसाठी मतदान होत असून, यामध्ये आठ राजकीय पक्षांच्या एकूण 209 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद झालं आहे. या निवडणुकीसाठी मिझोरममध्ये एकूण  7,70,395 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात 374,496 पुरुष,  3,94,897 महिला मतदारांचा समावेश होता. 


Assembly Election Results: गेल्या दोन निवडणुकांमध्ये मिझोरममधील स्थिती

Web Title: mizoram election results 2018 mizoram congress will go behind mnf will get most seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.