अल्पसंख्याकांसाठी देशात नवोदयसारख्या १०० शाळा, पाच उच्च शिक्षण संस्थांमध्ये ४० टक्के जागा मुलींसाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 02:30 AM2017-08-21T02:30:24+5:302017-08-21T02:30:43+5:30

अल्पसंख्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार नवोदय पद्धतीच्या १०० शाळा आणि पाच उच्च शिक्षण संस्थांमध्ये ४० टक्के जागा मुलींसाठी राखून ठेवणार आहे.

 For the minorities, 100 schools like Navodaya and 40% seats in five higher education institutions are reserved for girls | अल्पसंख्याकांसाठी देशात नवोदयसारख्या १०० शाळा, पाच उच्च शिक्षण संस्थांमध्ये ४० टक्के जागा मुलींसाठी राखीव

अल्पसंख्याकांसाठी देशात नवोदयसारख्या १०० शाळा, पाच उच्च शिक्षण संस्थांमध्ये ४० टक्के जागा मुलींसाठी राखीव

Next

नवी दिल्ली : अल्पसंख्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकार नवोदय पद्धतीच्या १०० शाळा आणि पाच उच्च शिक्षण संस्थांमध्ये ४० टक्के जागा मुलींसाठी राखून ठेवणार आहे.
केंद्रीय अल्पसंख्य कामकाज खात्याचे राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की,‘‘देशात सरकार अल्पसंख्यांक केंद्रीत असलेल्या भागांमध्ये नवोदय पद्धतीच्या १०० शाळा सुरू करण्याचा विचार करीत आहे.
समाजाने सन्मानाने सक्षम व्हावे, असे आम्हाला वाटते आणि त्यामुळे आम्ही शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. आम्ही या शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ४० टक्के राखीव जागा समाजातील मुलींसाठी राखून ठेवू. यामुळे त्या त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील.’’ शासकीय अनुदानित मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशनने स्थापन केलेल्या उच्च पातळीवरील समितीने नुकत्याच दिलेल्या आपल्या अहवालात अल्पसंख्य (विशेषत: मुस्लिम) समाजातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी तीन स्तरीय उपाययोजनेची शिफारस केली आहे.
या उपाययोजनांत प्राथमिक, माध्यमिक व तिसºया टप्प्यातील शिक्षण देण्यासाठी २११ शाळा, २५ समाज महाविद्यालये आणि पाच संस्थांची पायाभूत सुविधा सुरू करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.

Web Title:  For the minorities, 100 schools like Navodaya and 40% seats in five higher education institutions are reserved for girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.