#MeToo: ‘मी टू’चा गैरफायदा महिलांनी घेऊ नये; अभिनेते रजनीकांत यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 05:04 AM2018-10-21T05:04:58+5:302018-10-21T05:07:31+5:30

महिलांना अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ‘मी टू’ हे चांगले व्यासपीठ आहे.

#MeToo: Women should not take advantage of 'metoo'; Actor Rajinikant appealed | #MeToo: ‘मी टू’चा गैरफायदा महिलांनी घेऊ नये; अभिनेते रजनीकांत यांचे आवाहन

#MeToo: ‘मी टू’चा गैरफायदा महिलांनी घेऊ नये; अभिनेते रजनीकांत यांचे आवाहन

Next

चेन्नई : महिलांना अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ‘मी टू’ हे चांगले व्यासपीठ आहे. मात्र, महिलांनी या व्यासपीठाचा गैरफायदा घ्यायला नको, असे मत अभिनेते रजनीकांत यांनी शनिवारी व्यक्त केले. तामिळ पटकथा लेखक वैरमुत्तू यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपाविषयी विचारता ते म्हणाले की, त्यांनी त्याचे उत्तर दिलेलेच आहे. मी टू मोहिमेविषयी रजनीकांत प्रथमच बोलले आहेत.
विनोद दुआ यांची चौकशी
‘दी वायर’ या वृत्तपोर्टलने त्यांचे सल्लागार संपादक विनोद दुआ यांच्यावर चित्रपट निर्माती निष्ठा जैन यांनी केलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी बाहेरच्या चार मान्यवरांची समिती नेमली आहे. ‘दी वायर’ने म्हटले आहे की, १९८९ मध्ये आमचे पोर्टल अस्तित्वात नव्हते. तरीही या प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. आफताब आलम, पाटणा उच्च न्यायालयाच्या माजी न्या. अंजना प्रकाश, दिल्ली विद्यापीठाच्या माजी प्राध्यापिका नीरा चांढोक, ‘इन्स्टिट्यूट आॅफ इकॉनॉमिक ग्रोथ’च्या पॅट्रिशिया ओबेरॉय व माजी परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांची समिती नेमत आहोत.

Web Title: #MeToo: Women should not take advantage of 'metoo'; Actor Rajinikant appealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.