पाण्यासाठी सभापतींना घेराव बोअरिंगशिवाय नाही पर्याय : नितीन साहित्यानगरवासीयांचा मनपावर मोर्चा

By Admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:33+5:302016-02-02T00:15:33+5:30

जळगाव : सुप्रीम कॉलनीलगत गितांजली ऑईल मिलच्या पाठीमागे असलेल्या नितीन साहित्यानगरात पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची पाईपलाईनच नसल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणला. स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी घेराव घालून समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावर पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी प्रायोगिक तत्वावर सुप्रीम कॉलनीतील पाईपलाईन पुढे वाढवून देण्याचे मान्य केले.

Meeting with the chairpersons without watering. No option without boering: Nitin Vidyalaya's Manpavar Morcha | पाण्यासाठी सभापतींना घेराव बोअरिंगशिवाय नाही पर्याय : नितीन साहित्यानगरवासीयांचा मनपावर मोर्चा

पाण्यासाठी सभापतींना घेराव बोअरिंगशिवाय नाही पर्याय : नितीन साहित्यानगरवासीयांचा मनपावर मोर्चा

googlenewsNext
गाव : सुप्रीम कॉलनीलगत गितांजली ऑईल मिलच्या पाठीमागे असलेल्या नितीन साहित्यानगरात पिण्याच्या पाण्यासाठी मनपाची पाईपलाईनच नसल्याने त्रस्त नागरिकांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणला. स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी घेराव घालून समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यावर पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी प्रायोगिक तत्वावर सुप्रीम कॉलनीतील पाईपलाईन पुढे वाढवून देण्याचे मान्य केले.

महिला संतप्त
या मोर्चात महिलांचा समावेश अधिक होता. या वसाहतीत सुमारे ६०० लोक राहतात. केवळ बोअरिंगवरूनच पाणी उपलब्ध आहे. नवीन बोअरिंगला तर पाणीही लागत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. दोन वर्षांपासून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली.

नितीन साहित्यानगर हे गेल्या दोन-अडीच वर्षात विकसित झाले आहे. त्यामुळे तेथे मनपाची पाईपलाईन नाही. सुप्रीम कॉलनीत वाघूर जलवाहिनीवरून ६ इंची पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ती पाईपलाईनही पुढे ३ इंची होत गेली आहे. त्यामुळे सुप्रीम कॉलनीत देखील पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकत नाही. त्यापुढे नितीन साहित्यानगर असल्याने त्यांना या तीन इंची पाईपलाईनवरून पुढे पाईपलाईन जोडून दिली तरीही पाणी मिळणार नाही, अशी स्थिती आहे. मात्र नागरिकांच्या आग्रहावरून प्रायोगिक तत्वावर हे पाईपलाईन जोडून देण्याचे पाणीपुरवठा अभियंता खडके यांनी मान्य केले.

जलकंुभाची गरज
सुप्रीम कॉलनी व परिसरातील वसाहतींमध्ये तसेच मेहरूणसाठी पाणीपुरवठा करण्याकरीता वाघूर पाणीपुरवठा योजनेतच सुप्रीम कॉलनीत जलकुंभ उभारणे प्रस्तावित होते. मात्र तो जलकुंभ न उभारल्याने या अडचणी निर्माण झाल्या आहेत.


अमृत योजनेत प्रस्ताव
मनपाचा अमृत योजनेत समावेश झाला आहे. त्यात पिण्याच्या पाण्याच्या सुविधेला प्राधान्य असल्याने मनपाने वितरण योजनेतील सुधारणेचा आराखडा सादर केला आहे. त्यात सुप्रीम कॉलनीत जलकुंभ उभारण्याचे प्रस्तावित केले असल्याची माहिती खडके यांनी दिली.
---- इन्फो------
एमआयडीसी व मजिप्राला पत्र
पाणीपुरवठा विभागाने एमआयडीसीला पत्र पाठवून गितांजली केमिकल्सच्या पाईपलाईनवरून या नितीन साहित्या नगरातील नागरिकांसाठी तात्पुरती पाईपलाईन जोडून द्यावी, अशी विनंती केली आहे. मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार मनपाकडे ६ लाख रुपये घेणे असल्याचे एमआयडीसीचे म्हणणे आहे. दरम्यान मनपाने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडेही पत्र देऊन सुप्रीम कॉलनी व परिसरातील वसाहतींसाठी पाईपलाईनचा आराखडा तयार करून देण्याची मागणी केली आहे.

Web Title: Meeting with the chairpersons without watering. No option without boering: Nitin Vidyalaya's Manpavar Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.