रायबरेलीत भाजपतर्फे मीनाक्षी लेखी?; नवी दिल्लीतून भाजपाची 'गंभीर' खेळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 05:36 AM2019-04-02T05:36:49+5:302019-04-02T05:37:09+5:30

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधघत अमेठीतून पराभूत भाजपने स्मृती इराणी यांना तयार केले आहे.

Meenakshi wrote in BJP in Rae Bareli? BJP's 'serious' knock from New Delhi | रायबरेलीत भाजपतर्फे मीनाक्षी लेखी?; नवी दिल्लीतून भाजपाची 'गंभीर' खेळी

रायबरेलीत भाजपतर्फे मीनाक्षी लेखी?; नवी दिल्लीतून भाजपाची 'गंभीर' खेळी

Next

हरिश गुप्ता 

नवी दिल्ली : युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरुद्ध रायबरेलीमधून भाजपच्या नवी दिल्लीतील खासदार मीनाक्षी लेखी यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. गांधी कुटुंबातील उमेदवारांना पराभूत करण्याच्या योजनेचा भाग भाजप नेते लेखी यांच्या नावाचा विचार करीत आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधघत अमेठीतून पराभूत भाजपने स्मृती इराणी यांना तयार केले आहे. इराणी २०१४ मध्ये अमेठीतून पराभूत झाल्यावरही भाजपने त्यांना राज्यसभेत आणून मंत्रीपद दिले. आता सोनिया गांधी यांच्याविरोधात रायबरेलीत मीनाक्षी लेखी यांनी दोन हात करावेत अशी पक्षाची इच्छा आहे. मीनाक्षी लेखी पहिल्यांदा निवडून येऊनही भाजपने त्यांना विशेषाधिकार समितीचे अध्यक्षपद दिले. लेखी यांना आघाडीच्या वक्त्या म्हणून उभे केले. लेखी यांचे कुटुंब हे मूळातच गांधी-नेहरू कुटुंबाच्याविरुद्ध आहे. मीनाक्षी लेखी या दिवंगत वरिष्ठ वकील पी. एल. लेखी यांची स्नूषा असून त्यांच्या पतीला अतिरिक्त सॉलिसिटर जनरल हे पद दिले आहे. गांधी घराण्याच्या मतदारसंघांमध्ये त्यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याचा निर्धारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
पुडुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांच्या नावाचा भाजपने अमृतसरमधून विचार चालविला आहे. त्या सक्रिय राजकारणात परत येऊ इच्छितात. अमृतसरमध्ये काँग्रेसविरुद्ध सशक्त उमेदवार शोधण्यात भाजपला यश आलेले नाही. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी व अभिनेते सनी देओल यांच्या नावाची चर्चा होती परंतु, या दोघांनीही लढण्यास नकार दिला.
गौतम गंभीर उतरणार?
क्रिकेटपटू गौतम गंभीर याचा भाजप नवी दिल्ली मतदारसंघासाठी विचार करीत आहे. सोनिया गांधी यांच्याविरुद्ध २०१४ मध्ये १.७३ लाख मते मिळवणारे अजय अग्रवाल रायबरेलीतून पुन्हा लढायच्या तयारीत आहेत. परंतु, लेखी यांच्यासारखी प्रभावी वक्तृत्व असलेली व्यक्ती हा चांगला निर्णय असेल, असे पक्षाला वाटते. भाजपकडे रायबरेलीसाठी मजबूत उमेदवारच नाही.

Web Title: Meenakshi wrote in BJP in Rae Bareli? BJP's 'serious' knock from New Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.