मोदी सरकारनं 15 लाख न दिल्यानं त्यानं केला बँक जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 10:43 PM2018-06-08T22:43:44+5:302018-06-09T15:16:56+5:30

योग्य वेळी पोलीस दाखल झाल्यानं अनर्थ टळला

man tried to light up the branch in bahraich after not getting 15 lakhs promised by pm narendra modi | मोदी सरकारनं 15 लाख न दिल्यानं त्यानं केला बँक जाळण्याचा प्रयत्न

मोदी सरकारनं 15 लाख न दिल्यानं त्यानं केला बँक जाळण्याचा प्रयत्न

googlenewsNext

बहराईच: उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील जरवल येथे एका तरुणानं अलाहाबाद बँकेची शाखा पेटवण्याचा प्रयत्न केला. यासाठी या तरुणानं स्वत:सोबत 7 लिटर पेट्रोल आणलं होतं. तरुणानं बँकेची शाखा पेटवून देण्याचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ माजली. नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी दिलेलं 15 लाख रुपये बँक खात्यात जमा करण्याचं आश्वासन न पाळल्यानं या तरुणानं बँकेची शाखा पेटवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी चौकशीनंतर दिली. 

धनराजपूरचा रहिवासी असलेला मौजीलाल नावाचा तरुण सकाळी पावणे अकराच्या सुमारास अलाहाबाद बँकेच्या शाखेत आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 'पंतप्रधान मोदींनी 15 लाख रुपये बँक खात्यात जमा होतील, असं सांगितलं होतं. मात्र मोदींनी दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही, असं मौजीलालचं म्हणणं होतं. मोदींनी न दिलेले पैसे बँक अधिकाऱ्यांनी द्यावेत, अशी मागणी मौजीलाल करत होता,' असं पोलिसांनी सांगितलं. मौजीलालची ही मागणी पूर्ण करण्यास बँक कर्मचाऱ्यांनी असमर्थतता दर्शवली. त्यामुळे त्यानं त्याच्याकडे असलेले 7 लिटर पेट्रोल बँकेच्या शाखेत ओतलं आणि आग लावण्याची धमकी दिली. 

या घटनेमुळे शाखेत एकच गोंधळ झाला. यावेळी झालेल्या गोंधळात काहीजण जखमी झाले. यानंतर मौजीलालनं आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मौजीलालला अटक करुन घटनेचा तपास सुरू केला. मौजीलालची मानसिक स्थिती ठिक नसल्याची माहिती जरवल पोलीस ठाण्याचे प्रभारी अभय सिंह यांनी प्राथमिक चौकशीनंतर दिली. 
 

Web Title: man tried to light up the branch in bahraich after not getting 15 lakhs promised by pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.