अखेर ममता बॅनर्जींची डॉक्टरांसोबतची बैठक ठरली ; तोडगा निघण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 11:40 AM2019-06-17T11:40:04+5:302019-06-17T11:44:10+5:30

डॉक्टरांनी जरीही ममता यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयारी दर्शवली असली तरीही, जो पर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत डॉक्टरांचा संपसुरूच राहणार असल्याचे डॉक्टर संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

Mamta Banerjee finally became the meeting with the doctors | अखेर ममता बॅनर्जींची डॉक्टरांसोबतची बैठक ठरली ; तोडगा निघण्याची शक्यता

अखेर ममता बॅनर्जींची डॉक्टरांसोबतची बैठक ठरली ; तोडगा निघण्याची शक्यता

Next

कोलकाता - पश्चिम बंगालमध्येडॉक्टरांसोबत झालेल्या हिंसाचारानंतर देशभरातील डॉक्टरांनी या घटनेचा निषेध करत संप पुकारला आहे. गेल्या मंगळवारपासून पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टर संपावर आहेत. तर, याचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहे. पश्चिम बंगालच्या संपकरी डॉक्टरांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला असून, आज ( सोमवारी ) सचिवालयात दुपारी एक वाजता ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीतून संपावर तोडगा काढण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पश्चिम बंगालमधील डॉक्टरांसोबत झालेल्या हिंसाचारानंतर तेथील डॉक्टर ६ दिवसांपासून संपावर गेले आहेत. त्यांनतर ममता बॅनर्जी यांनी हा भाजपचा कट असल्याची प्रतिकिया दिली होती. मात्र , डॉक्टर माघार घेत नसल्याचे लक्षात येताच ममतांनी डॉक्टरांसोबत चर्चा करण्याचा निणर्य घेतला आहे. दुसरीकडे डॉक्टर संघटनांनी सुद्धा याला तयारी दर्शवली आहे. आज दुपारी याविषयी ममता बॅनर्जी आणि डॉक्टर संघटनेच्या प्रतिनिधीमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व मेडिकल कॉलेजचे दोन प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या बैठकीतून काही तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

डॉक्टरांनी जरीही ममता यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयारी दर्शवली असली तरीही, जो पर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत डॉक्टरांचा संपसुरूच राहणार असल्याचे डॉक्टर संघटनेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे डॉक्टरांचासंप आज सोमवारी पुन्हा सुरु राहणार आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल कायम राहणार आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आवाहनानंतर देशातील ५ लाख डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला आहे. दिल्लीमेडिकल असोसिएशनचे १८ हजार डॉक्टरही संपावर आहेत.

बैठकीत माध्यमांना परवानगी नाही.

आज होणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डॉक्टर यांच्या बैठकीत आधी माध्यमांच्या समोरच चर्चा करण्याची अट घालणाऱ्या डॉक्टर संघटनांनी आता बैठकीत माध्यमांना परवानगी देऊ नयेत अशी मागणी केली आहे. त्यामुळे दुपारी होणाऱ्या या बैठकीत माध्यमांच्या प्रतिनिधींना परवानगी नाकारण्यात आली आहे.

 

 

 

Web Title: Mamta Banerjee finally became the meeting with the doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.