संसदेत घुमला आवाज मराठी, डॉ. अमोल कोल्हेंनी उच्चारलं 'जय शिवराय' 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 08:46 AM2019-06-18T08:46:05+5:302019-06-18T08:47:23+5:30

औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी कोणत्या भाषेत खासदारकीची शपथ घेणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती मात्र त्यांनी मराठीतून शपथ घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. 

Maharashtra MP taking oth in Marathi | संसदेत घुमला आवाज मराठी, डॉ. अमोल कोल्हेंनी उच्चारलं 'जय शिवराय' 

संसदेत घुमला आवाज मराठी, डॉ. अमोल कोल्हेंनी उच्चारलं 'जय शिवराय' 

googlenewsNext

नवी दिल्ली - 17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी संसदेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. अनेक खासदारांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत शपथ घेतली. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिले होते ते महाराष्ट्रातील खासदार कोणत्या भाषेत शपथ घेतील याकडे. 

महाराष्ट्रातील 48 पैकी 34 खासदारांची मराठी भाषेतून शपथ घेतली. भाजपाचे रावसाहेब दानवे, शिवसेनेचे अरविंद सावंत या केंद्रीय मंत्र्यांनी खासदारकीची शपथ मराठीतून घेतली. त्यापाठोपाठ औरंगाबाद येथील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, धैर्यशील माने, नवनीत राणा, प्रितम मुंडे यांनी लोकसभेत मराठीतून शपथ घेतली. औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी कोणत्या भाषेत खासदारकीची शपथ घेणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती मात्र त्यांनी मराठीतून शपथ घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. 
तर सुप्रिया सुळे यांनी हिंदीतून आणि, सातारचे खासदार उदयनराजे भोसले, डॉ. सुजय विखे यांनी इंग्रजीतून सदस्यत्वाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली त्याचसोबत जय शिवराय, जय महाराष्ट्र असं उच्चारताच संसदेत जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणाबाजी झाली. 

भाजपाचे मनोज कोटक, शिवसेनेचे विनायक राऊत, ओमप्रकाश निंबाळकर,सदाशिव लोखंडे, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे, राजन विचारे, गजानन किर्तीकर यांच्यासह अन्य खासदारांनी मराठीतून शपथ घेतली. पूनम महाजन, हिना गावित, नितीन गडकरी, सुधाकर शृंगारे, गोपाळ शेट्टी ह्यांनी हिंदीतून शपथ घेतली तर सुजय विखे, उदयनराजे भोसले ह्यांनी इंग्रजीमधून तर गिरीष बापट, उन्मेश पाटील, सुनील मेंढे ह्यांनी संस्कृत मधून शपथ घेतली.अनेक दिवसांपासून संसदेत महाराष्ट्रातील खासदारांनी मराठीत शपथ घ्यावी यासाठी सोशल मिडीयावर मोहीम सुरु होती. ट्विटर, फेसबुक अशा माध्यमातून खासदारांना मराठीत शपथ घ्यावी यासाठी प्रोत्साहित केलं जात होतं. 
17 व्या लोकसभेत भाजपाचे 22 खासदार, शिवसेनेचे 18 खासदार, काँग्रेस 1 आणि राष्ट्रवादीचे 5 खासदार निवडून गेले आहेत. 

Web Title: Maharashtra MP taking oth in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.