Madhya Pradesh, Mizoram Elections : मध्य प्रदेशात 230 तर मिझोरममध्ये 40 जागांसाठी मतदान सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 08:36 AM2018-11-28T08:36:38+5:302018-11-28T08:40:22+5:30

मध्य प्रदेश व मिझोरम या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

madhya pradesh and mizoram assembly elections 2018 voting | Madhya Pradesh, Mizoram Elections : मध्य प्रदेशात 230 तर मिझोरममध्ये 40 जागांसाठी मतदान सुरु

Madhya Pradesh, Mizoram Elections : मध्य प्रदेशात 230 तर मिझोरममध्ये 40 जागांसाठी मतदान सुरु

Next
ठळक मुद्देमध्य प्रदेशात 2899 उमदेवार आपले नशीब आजमावत आहेत.मिझोरमध्ये 40 जागांसाठी 209 उमेदवार मैदानात उतरले आहेत.दोन्ही राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात

नवी दिल्ली : मध्य प्रदेश व मिझोरम या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या 230 जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत 2899 उमदेवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये 2644 पुरुष, 250 महिला आणि 5 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी मध्य प्रदेशात एकूण 5,04,95,251 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 2,63,01,300 पुरुष, 2,41,30,390 महिला आणि 1389 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, बालाघाट जिल्ह्यातील तीन नक्षलप्रभावित विधानसभा मतदारसंघातील परसवाडा, बेहर आणि लांजी येथे सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत मतदान होणार आहे.

दुसरीकडे, मिझोरमध्ये 40 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये आठ राजकीय पक्षांचे एकूण 209 उमेदवार मैदानात उतरले आहेत. या निवडणुकीसाठी मिझोरममध्ये एकूण  7,70,395 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात  374,496 पुरुष,  3,94,897  महिला मतदारांचा समावेश आहे. 
 

Web Title: madhya pradesh and mizoram assembly elections 2018 voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.