Parliament Monsoon Session : मोदी सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत होणार परीक्षा, अविश्वास प्रस्ताव दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 12:38 PM2018-07-18T12:38:05+5:302018-07-18T13:55:19+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत परीक्षा होणार आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

Lok Sabha Speaker accepts No Confidence Motion against Narendra Modi Government by Opposition | Parliament Monsoon Session : मोदी सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत होणार परीक्षा, अविश्वास प्रस्ताव दाखल

Parliament Monsoon Session : मोदी सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत होणार परीक्षा, अविश्वास प्रस्ताव दाखल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत परीक्षा होणार आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

देशातील लोकांच्या समस्या सोडवण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत लोकसभेत टीडीपीने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला काँग्रेसह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस स्वीकारली आहे. त्यामुळे आता मोदी सरकारची पहिल्यांदाच लोकसभेत परीक्षा होणार आहे. या अविश्वास प्रस्तावावर येत्या शुक्रवारी चर्चा होणार आहे. 


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला. पावसाळी अधिवेशन 10 ऑगस्टपर्यंत चालणार असून यामध्ये एकूण 18 बैठका होणार आहेत.  सरकारसमोर महत्त्वपूर्ण विधेयकं पारित करण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे संसदेत सरकारला चहुबाजूंनी घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी रणनीती आखली आहे. 



 

Web Title: Lok Sabha Speaker accepts No Confidence Motion against Narendra Modi Government by Opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.