शिवराज सिंहांंचा कर्ज माफीसाठी अर्ज केला नसल्याचा दावा; काँग्रेसने सादर केले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 05:26 PM2019-05-09T17:26:56+5:302019-05-09T18:04:03+5:30

कॉंग्रेसच्या खेळीवर शिवराज सिंह यांनी पलटवार केल्याने आता काँग्रेस याला कसे उत्तर देणारा याकडे लक्ष सर्वांचे लक्ष लागले असतानाच, कॉंग्रेसने कर्ज माफीसाठी भरलेले अर्जच समोर आणल्याने शिवराज चौहान यांची गोची झाली आहे.

lok sabha election 2019 shivraj chauhan on congress | शिवराज सिंहांंचा कर्ज माफीसाठी अर्ज केला नसल्याचा दावा; काँग्रेसने सादर केले पुरावे

शिवराज सिंहांंचा कर्ज माफीसाठी अर्ज केला नसल्याचा दावा; काँग्रेसने सादर केले पुरावे

googlenewsNext

 

मुंबई - मध्य प्रदेशात काँग्रेसने केलेल्या कर्जमाफीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या कुटुंबातील व्यक्तींना कर्ज माफी दिलेच्या कॉंग्रेसच्या दाव्यानंतर. त्याला उत्तर देतांना शिवराज चौहान तोंडघशी पडले आहेत.

सरकारने इतर शेतकऱ्यांसह मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे भाऊ रोहित सिंह आणि काका निरंजन सिंह यांचे देखील कर्ज माफ केले असल्याचा दावा कॉंग्रेसने केला होता. मात्र, माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी कर्जमाफीसाठी अर्ज सादर न करता कर्ज माफी कशी झाली. असा, सवाल उपस्थित करणाऱ्या शिवराज चौहान यांच्या कुटुंबातील व्यक्तीने कर्ज माफीसाठी सादर केलेले अर्ज कॉंग्रेसने समोर आणले आहे.

कॉंग्रेसने केलेला दावा मी पडताळून पहिला असता, माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी कर्जमाफीसाठी अर्जच केले नसल्याचे म्हणणारे शिवराज चौहान तोंडघशी पडले आहे. कॉंग्रेसच्या खेळीवर शिवराज सिंह यांनी पलटवार केल्याने आता काँग्रेस याला कसे उत्तर देणारा याकडे लक्ष सर्वांचे लक्ष लागले असतानाच, कॉंग्रेसने कर्ज माफीसाठी भरलेले अर्जच समोर आणल्याने शिवराज चौहान यांची गोची झाली आहे.

काँग्रेस नेत्यांनी शेतकरी कर्जमाफीचे अनेक दस्ताऐवज शिवराज सिंह यांच्या घरी पाठवून दिले होते त्यांनतर कर्ज माफीचा मुद्दा चर्चेत आला होता. राहुल गांधींनी आपल्या सभेत शिवराज चौहान यांच्या भावासहित चार मुलांचे कर्ज माफी कॉंग्रेसच्या काळात झाले असल्याचा उल्लेख केला होता.

 

 

 

 

 

Web Title: lok sabha election 2019 shivraj chauhan on congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.