मालेगाव स्फोटातील आणखी एका आरोपीचे शहीद करकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 10:49 AM2019-04-27T10:49:35+5:302019-04-27T10:51:50+5:30

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी उपाध्याय याने शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बालिया मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मेजर उपाध्यायने अखिल भारतीय हिंदू महासभेकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रज्ञा सिंह हिच्या उमेदवारीवर सहमती दर्शविली आहे.

Lok Sabha Election 2019 malegaon blast accused major ramesh upadhyay controversial comment | मालेगाव स्फोटातील आणखी एका आरोपीचे शहीद करकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य

मालेगाव स्फोटातील आणखी एका आरोपीचे शहीद करकरेंविषयी वादग्रस्त वक्तव्य

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत भोपाळमधून लोकसभा उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूरपाठोपाठ मालेगाव बॉम्बस्फोटातील आणखी एका आरोपीने शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. निवृत्त मेजर रमेश उपाध्यायने म्हटले की, हेमंत करकरे अतिरेक्यांच्या हातून मारले जाणे म्हणजे हा त्यांच्या नालायकपणाचा पुरावा आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी उपाध्याय याने शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बालिया मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मेजर उपाध्यायने अखिल भारतीय हिंदू महासभेकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रज्ञा सिंह हिच्या उमेदवारीवर सहमती दर्शविली आहे.

कोणताही पोलिस अधिकारी मरण पावला तर त्याला शहीद म्हटले जात नाही. शहीद केवळ स्वातंत्र सैनिक आणि सैनिक असतात. पोलिस अधिकारी कधीही शहीद नसतो. हेमंत करकरे यांनी प्रज्ञा सिंह हिला निर्वस्त्र करून मारले होते. तसेच आम्हा सर्वांना प्रचंड यातना दिल्या होत्या असही उपाध्यायने सांगितले. तसेच आरोपीमधील १२ पैकी ११ लोक व्यवस्थित चालू शकत नव्हते. प्रज्ञा ठाकूर व्हिलचेअरवर होत्या. त्यामुळे यावरून अंदाज येऊ शकतो, की आमच्यावर किती अत्याचार झाला, असंही उपाध्यायने सांगितले.

आरोपी उपाध्याय याने तत्कालीन युपीए सरकारला जबाबदार धरले आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, अहमद पटेल, पी. चिंदबरम, सुशील कुमार शिंदे आणि इतर नेत्यांच्या आदेशांमुळेच आमच्यावर कारवाई झाल्याचे उपाध्यायचे म्हणणे आहे.

दुसरीकडे ७१ माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भोपाळमधून प्रज्ञा सिंह हिला देण्यात आलेल्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. तसेच खुले पत्र लिहून प्रज्ञा सिंहची उमेदवारी मागे घेण्याची मागणी केली आहे. आपल्या शापामुळेच हेमंत करकरे यांचा सर्वनाश झाल्याचे वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा सिंहने केले होते.

Web Title: Lok Sabha Election 2019 malegaon blast accused major ramesh upadhyay controversial comment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.