LICची 'ही' पॉलिसी देते तुमच्या पैशांची हमी, दरवर्षी 6000 रुपयांहून अधिकचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 09:37 PM2018-08-27T21:37:59+5:302018-08-27T21:38:16+5:30

देशातली सर्वात मोठी विमा संरक्षण देणा-या LIC या कंपनीनं एक जबरदस्त प्लान बाजारात आणला आहे.

lic policy offer special insurance plan which give yearly benefit to customer | LICची 'ही' पॉलिसी देते तुमच्या पैशांची हमी, दरवर्षी 6000 रुपयांहून अधिकचा फायदा

LICची 'ही' पॉलिसी देते तुमच्या पैशांची हमी, दरवर्षी 6000 रुपयांहून अधिकचा फायदा

नवी दिल्ली- देशातली सर्वात मोठी विमा संरक्षण देणा-या LIC या कंपनीनं एक जबरदस्त प्लान बाजारात आणला आहे. या पॉलिसींतर्गत तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे. LICची ही पॉलिसी तुम्हाला पेन्शनबरोबर प्रत्येक वर्षी काही हजार रुपयेही फायद्याच्या स्वरूपात देणार आहे. एलआयसीच्या या पॉलिसीचं नाव आहे जीवन अक्षय VI योजना. ही एक सिंगल प्रीमियम म्हणजे एकरकमी योजना आहे.

तुम्ही या पॉलिसीअंतर्गत एका गुंतवणूक केल्यास तुम्हाला ती आयुष्यभर पेन्शनच्या स्वरूपात फायदा पोहोचवते. या पॉलिसीमध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी 6500 रुपयांचा फायदा मिळतो. या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी 7 पर्याय उपलब्ध आहेत. ज्यातील कुठलाही पर्याय तुम्ही निवडू शकता. विशेष म्हणजे या पॉलिसीअंतर्गत तुमच्या मृत्यूनंतर जोडीदाराला आयुष्यभर पेन्शन मिळणार आहे. या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करायची आहे. त्यामुळे LIC गुंतवणूक केलेल्या पैशांतून तुम्हाला किती फायदा मिळणार याची माहिती देत असते. पेन्शनच्या स्वरूपात प्राप्त होणारा पैसा तुम्ही महिनाभर, तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षांनीही मिळवू शकता. पैसे मिळवण्याच्या पर्यायाद्वारे तुम्ही संबंधित योजनेनुसार रक्कम जमा करू शकता. तुम्ही महिना किंवा वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हालाही तशाच प्रकारचा फायदा मिळणार आहे. 
दर महिन्याला मिळणार एवढी पेन्शन
LICच्या एका अधिका-याच्या माहितीनुसार, या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. तुम्ही ज्या पद्धतीनं गुंतवणूक करता तशाच प्रकारे तुम्हाला फायदा मिळतो. तुम्ही लाखाच्या वर पैसे जमा केल्यास तुम्हाला त्याच्या फायद्याच्या स्वरूपात 6.5 हजार रुपये फायदा मिळतो. 

Web Title: lic policy offer special insurance plan which give yearly benefit to customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.