दहा वेळा खासदार राहून सुद्धा, पक्षाने 'या' नेत्याची केली होती हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 01:20 PM2019-07-07T13:20:44+5:302019-07-07T13:22:56+5:30

लोकसभा अध्यक्ष हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो ह्या मताचा मी असल्याचे ते म्हणाले होते.

Leaving ten times the MP | दहा वेळा खासदार राहून सुद्धा, पक्षाने 'या' नेत्याची केली होती हकालपट्टी

दहा वेळा खासदार राहून सुद्धा, पक्षाने 'या' नेत्याची केली होती हकालपट्टी

Next

नवी दिल्ली - भारतच्या राजकरणात अनेक असे नेते होऊन गेले ज्यांनी आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती. यातील एक म्हणजे माजी लोकसभा अध्यक्ष आणि दिवंगत ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सोमनाथ चटर्जी यांचे नाव घेतले जाते. तब्बल १० वेळा ते देशाच्या लोकसभेत निवडून गेले. तर यूपीए सरकारच्या काळात ते लोकसभा अध्यक्ष सुद्धा राहिले. मात्र २००८ मध्ये त्यांनी पक्षाचे आदेश धुडकावून लावल्यामुळे त्यांना पक्षातून काढण्यात आले होते.

१९६८ मध्ये चटर्जी यांनी वकिली सोडून कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश करत राजकरणात एन्ट्री केली. १९७१ मध्ये पहिल्यांदाच ते खासदार झाले. त्यांनतर चटर्जी हे एक-दोन नव्हेत तर चक्क १० वेळा खासदार म्हणून संसदेत गेले होते. २००४ ते २००९ च्या काळात ते लोकसभा अध्यक्ष होते. भारत-अमेरिका अणुकराराच्या मुद्द्यावर २००८ साली माकपने केंद्रातील मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. चॅटर्जी त्यावेळी लोकसभेचे अध्यक्ष होते. पक्षानं त्यांना पद सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी तो आदेश धुडकावून लावला. त्यामुळं त्यांना पक्षातून काढण्यात आलं.

सोमनाथ चटर्जी यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितेले होते की, माझ्या आयुष्यात सर्वात दुःखाचा काळ म्हणजे, २००८ मध्ये मला पक्षाने लोकसभा अध्यक्ष पद सोडण्याचे आदेश दिले. त्यावेळी पक्षाने जरी सरकारचा पाठींबा काढण्याचे ठरवले होते, मात्र लोकसभा अध्यक्ष हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो ह्या मताचा मी असल्याचे ते म्हणाले होते.

 

 

 

Web Title: Leaving ten times the MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.