वकीलाने न्यायाधीशांना म्हटलं 'हँडसम', उत्तर मिळालं 'गेटआऊट'

By admin | Published: October 28, 2016 10:36 PM2016-10-28T22:36:08+5:302016-10-29T07:14:36+5:30

कोणाचंही कौतुक केलं तर समोरचा खुश होतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा हा गैरसमज ही बातमी वाचल्यावर दूर होईल.

The lawyer said to the judges 'handsom', 'getout' | वकीलाने न्यायाधीशांना म्हटलं 'हँडसम', उत्तर मिळालं 'गेटआऊट'

वकीलाने न्यायाधीशांना म्हटलं 'हँडसम', उत्तर मिळालं 'गेटआऊट'

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - कोणाचंही कौतुक केलं तर समोरचा खूष होतो, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा हा गैरसमज ही बातमी वाचल्यावर दूर होईल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश टी.एस. ठाकूर यांना सुनावणी दरम्यान एका वकिलाने हॅंडसम असं म्हटल्यावर कोर्टात उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र, खुद्द टी.एस. ठाकूर चांगलेच नाराज झाले आणि त्यांनी त्या वकिलाला कोर्टाबाहेर काढलं.  त्यानंतर विनंती केल्यावर त्यांनी वकिलाला सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी दिली. 
 बुधवारी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत महत्वाची सुनावणी सुरू होती. सरकार कोलेजियमची पाठवलेली यादी उघड करत नसल्याचं म्हणत टी.एस.ठाकूर केंद्र सरकारवर टीका करत होते. त्याचवेळी एका वकिलाने मी पण या मुद्दयावर विनंती अर्ज दिला असल्याचं म्हटलं त्यावर ठाकूर यांनी  वकिलाला गप्प राहण्यास सांगितलं. थोड्यावेळाने त्या वकिलाने पुन्हा बोलायला सुरूवात केली आणि आम्ही ठाकूर यांचा खूप सन्मान करतो असं म्हणत ते खूप हॅंडसम आहेत असं म्हटलं. यावर कोर्टरूममधील सर्व हसायला लागले. थोड्या वेळासाठी ठाकूर देखील हसले मात्र लगेचच, ते गंभीर झाले आणि त्यांनी कोर्ट मास्टरला संबंधित वकिलाला बाहेर काढण्यास सांगितलं. थोड्या वेळाने त्यांनी त्या वकिलाला सुनावणी दरम्यान उपस्थित राहण्याची परवानगी दिली. मात्र, सुनावणी दरम्यान न बोलण्याची अट घातली. 
 
 
 
 

Web Title: The lawyer said to the judges 'handsom', 'getout'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.