Kerala Floods: केरळसाठी क्रीडा विश्व एकवटले, केले भावनिक आवाहन!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 11:19 AM2018-08-18T11:19:30+5:302018-08-18T11:19:36+5:30

Kerala Floods: केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत.

Kerala floods: Sports world come to help for Kerala | Kerala Floods: केरळसाठी क्रीडा विश्व एकवटले, केले भावनिक आवाहन!

Kerala Floods: केरळसाठी क्रीडा विश्व एकवटले, केले भावनिक आवाहन!

Next

मुंबई  - केरळमध्ये आलेल्या महापुरात आजपर्यंत तीनशेच्या वर बळी गेले असून हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झाले आहेत. राज्यातील १४ जिल्ह्यांत रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सैन्याचे मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्यासह क्रीडा विश्वातील अनेकांनी केरळ वासियांच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना केली आहे.

"केरळमधील प्रत्येकाने सुरक्षिततेची काळजी घ्यावी. शक्य असेल तर घरातच रहावे. लवकरच ही परिस्थिती सुधारेल अशी आशा करतो.  या परिस्थितीत मदतकार्य करणाऱ्या भारतीय जवानांचे आभार," असे विराटने ट्विट केले आहे. 



टेनिस स्टार सानिया मिर्झानेही, खेळाडू आणि संपूर्ण भारतीय तुमच्या पाठीशी आहेत, असा मॅसेज पाठवला आहे. 

 
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील याने व्हिडीओच्या माध्यमातून केरळच्या जनतेसाठी मदतीचे आवाहन केले आहे.


भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या, हरभजन सिंग, केरळा ब्लास्टर क्लबचा फुटबॉलपटू इयान ह्युम याच्यासह क्रीडा विश्वातील अनेकांनी केरळच्या लोकांसाठी मदतीची साद घातली आहे. 



Web Title: Kerala floods: Sports world come to help for Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.