Kerala Floods: एका दिवसात पावसाचे तब्बल 106 बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 08:28 AM2018-08-18T08:28:55+5:302018-08-18T08:36:31+5:30

Kerala Floods: केरळमध्ये १०० वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाने एका दिवसात तब्बल 106 जणांचा बऴी घेतला आहे.

Kerala Floods death toll in floods and landslides in kerala to 106 | Kerala Floods: एका दिवसात पावसाचे तब्बल 106 बळी

Kerala Floods: एका दिवसात पावसाचे तब्बल 106 बळी

Next

तिरुअनंतपुरम - मुसळधार पावसाने केरळमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. केरळमधील पूरप्रकोपात आतापर्यंत ३२४ जणांचा मृत्यू झाला असून २ लाख नागरिक बेघर झाले आहेत. केरळमध्ये १०० वर्षातील सर्वात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाने एका दिवसात तब्बल 106 जणांचा बळी घेतला आहे. जोरदार पावसामुळे आतापर्यंत 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. 


केरळमध्ये पुराने थैमान घातले असून, सातत्याने कोसळत असलेला पाऊस आणि आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान, केरळमधील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री राज्यात दाखल झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळच्या पूरस्थितीची हवाई पाहणी करणार आहेत. 



संततधारेमुळे केरळ राज्याचे कंबरडे मोडले असून, पर्यटन व्यवसायालाही फटका बसला आहे. हजारो एकरातील उभ्या पिकांचे नुकसान झाले असून पायाभूत सुविधांची मोठी हानी झाली आहे. हवामान खात्यानं राज्यातील 14 पैकी 13 जिल्ह्यांत पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच सेंट्रल वॉटर कमिशनही पुराचं पाणी तुंबणाऱ्या भागावर नजर ठेवून आहे. केरळमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहता एनडीआरएफच्या पाच टीम तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच एनडीआरएफची आणखी जवान केरळमध्ये दाखल झाले आहेत. 



केरळच्या मुख्यमंत्र्यांचं मदतीचं आवाहन

केरळमधल्या पथनमतित्ता जिल्ह्यातील रन्नी, अरनमुला, कोझेनचेरी गावांतील लोक मुसळधार पावसामुळे घरातच अडकून पडली आहेत. पथनमतित्ता, एर्नाकुलम आणि थरिस्सूर जिल्ह्यांतील अनेक भागात पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक आहे. त्यामुळे गल्लीबोळाला नद्यांचं स्वरूप आलं आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे जास्तीची मदत मागितली आहे.  दरम्यान, दिल्ली आणि पंजाब सरकारने केरळला प्रत्येकी 10 कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 



 

Web Title: Kerala Floods death toll in floods and landslides in kerala to 106

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.