केजरीवाल घसरले; भाषणात केला मनोज तिवारींच्या वडिलांचा वादग्रस्त उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 05:12 PM2019-03-13T17:12:10+5:302019-03-13T17:12:58+5:30

अरविंद केजरीवाल यांनी भाजप नेते मनोज तिवारी यांच्या दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासंदर्भातील आक्षेपाचा समाचार घेतला.

Kejriwal declined, in his speech, controversial mention of Manoj Tiwari's father | केजरीवाल घसरले; भाषणात केला मनोज तिवारींच्या वडिलांचा वादग्रस्त उल्लेख

केजरीवाल घसरले; भाषणात केला मनोज तिवारींच्या वडिलांचा वादग्रस्त उल्लेख

Next

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणूक दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या मुद्द्यावर सध्या दिल्लीतील राजकारण तापले आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप नेते मनोज तिवारी यांच्या वडिलांना संबोधून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

दिल्लीत एका सभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी तिवारी यांच्या दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यासंदर्भातील वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, गुजरात, आंध्रप्रदेश, बिहार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यासाठी आंदोलने केली आहेत. या राज्यांना देखील कमकुवत करणार का ? दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यापासून रोखणारे मनोज तिवारी आहे तरी कोण ? दिल्ली राज्य मनोज तिवारींच्या बापाचे आहे काय ? दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी मनोज तिवारी यांच्या बापाने आंदोलन केले नाही, असं वादग्रस्त वक्तव्य केजरीवाल यांनी केले. 

काही दिवसांपूर्वीच मनोज तिवारी यांनी म्हटले होते की, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येऊ नये, असे केल्यास देशातील संघराज्य पद्धतीला धोका निर्माण होईल. 

केजरीवालांकडून भाजपच्या घोषणापत्राचे दहण
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आयोजित जाहीर सभेत भाजपच्या 2014 मधील घोषणा पत्राची होळी केली. भाजपच्या 2014 च्या घोषणापत्रात दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील सात जागा जिंकल्यास दिल्लीला पूर्ण राज्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र भाजप आणि मोदी यांनी दिल्लीकरांना फसवले आहे. मागील 70 वर्षांपासून दिल्लीतील लोकांचा अपमान करण्यात येणार असून यापूढे हे सहन केले जाणार नाही, असंही केजरीवाल यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: Kejriwal declined, in his speech, controversial mention of Manoj Tiwari's father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.