पुस्तक समोर ठेवा अन् पेपर लिहा; नववी ते बारावीसाठी सीबीएसईचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 12:02 PM2024-02-23T12:02:54+5:302024-02-23T12:03:10+5:30

ओपन बुक परीक्षा देताना विद्यार्थी आपल्यासोबत पुस्तक, नोट्स या गोष्टी परीक्षा केंद्रात घेऊन जाऊ शकतो. या साधनांच्या मदतीने तो परीक्षा देऊ शकतो. कोरोना साथीच्या काळात दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ओपन बुक पद्धतीने परीक्षा देण्याची सवलत दिली होती.  

Keep the book in front of you and write the paper; CBSE Considerations for 9th to 12th | पुस्तक समोर ठेवा अन् पेपर लिहा; नववी ते बारावीसाठी सीबीएसईचा विचार

पुस्तक समोर ठेवा अन् पेपर लिहा; नववी ते बारावीसाठी सीबीएसईचा विचार

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) इयत्ता नववी ते बारावीपर्यंत ओपन बुक परीक्षा घेण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. याआधी सीबीएसईने इयत्ता नववी ते अकरावीसाठी ओपन बुक परीक्षा घेण्याचा प्रयोग २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीमध्ये तीन वर्ष केला होता.
सीबीएसई प्रथम काही शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर इयत्ता नववी व दहावीच्या वर्गात इंग्लिश, गणित, विज्ञान या विषयांसाठी ओपन बुक परीक्षा घेण्याच्या विचारात आहे. त्याचबरोबर अकरावी व बारावी इयत्तेच्या वर्गात इंग्लिश, गणित, जीवशास्त्र या विषयांसाठी अशा प्रकारची परीक्षा घेण्याचा प्रस्ताव आहे. ही पद्धत किती योग्य वाटते याची पडताळणीही होणार आहे.

असे आहे ओपन बुक परीक्षेचे स्वरूप

ओपन बुक परीक्षा देताना विद्यार्थी आपल्यासोबत पुस्तक, नोट्स या गोष्टी परीक्षा केंद्रात घेऊन जाऊ शकतो. या साधनांच्या मदतीने तो परीक्षा देऊ शकतो. कोरोना साथीच्या काळात दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ओपन बुक पद्धतीने परीक्षा देण्याची सवलत दिली होती.  

आधीच्या प्रयत्नांवर झाली होती टीका

२०१४ ते २०१७ या कालावधीत इयत्ता नववी ते अकरावीसाठी ओपन बुक परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्याला विद्यार्थ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला नव्हता. त्या परीक्षेतील नकारात्मक बाजूंबाबत विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षणतज्ज्ञ यांनी टीका केली होती. यंदाच्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात काही निवडक शाळांमध्ये सीबीएसई ओपन बुक परीक्षा घेण्याची शक्यता आहे. 

Web Title: Keep the book in front of you and write the paper; CBSE Considerations for 9th to 12th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.