कार्ती चिदंबरम यांना सहा दिवसांची सीबीआय कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 06:01 AM2018-03-02T06:01:16+5:302018-03-02T06:01:16+5:30

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयने अटक केलेले पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना गुरुवारी विशेष न्यायालयाने सहा दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली.

Karti Chidambaram gets CBI plea for six days | कार्ती चिदंबरम यांना सहा दिवसांची सीबीआय कोठडी

कार्ती चिदंबरम यांना सहा दिवसांची सीबीआय कोठडी

Next

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयने अटक केलेले पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना गुरुवारी विशेष न्यायालयाने सहा दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. विशेष न्यायाधीश सुनील राणा यांनी कार्ती यांची कोठडी ६ मार्चपर्यंत वाढविली. तथापि, कार्ती यांच्या वकीलांना त्यांना दररोज सकाळ व संध्याकाळ एक-एक तास भेटण्यास परवानगी दिली आहे.
सीबीआयने न्यायालयात सांंगितले की, कार्ती यांनी विदेशातून जाऊन जे काही केले त्याचे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत.
>सीबीआय म्हणजे गाणारे पोपट : सिब्बल
सीबीआयकडून कार्ती चिदंबरम यांना झालेली अटक म्हणजे भारतीय तपास संस्था आता केवळ सरकारी पिंजºयातील बंद पोपट नाहीत तर, गाणारे पोपट आहेत हे सिद्ध होत आहे, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी गुरुवारी सीबीआयला लक्ष्य केले.

Web Title: Karti Chidambaram gets CBI plea for six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.