'मोदी-शहांना गडकरी आवडत नाहीत', सावरकर-हेडगेवर प्रकरणावरुन काँग्रेस नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 01:40 PM2023-06-18T13:40:33+5:302023-06-18T13:40:56+5:30

Karnataka Syllabus Controversy: 'नितीन गडकरी RSS ला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत.'

Karnataka Syllabus Controversy: 'Narendra Modi-Amit Shah don't like Nitin Gadkari', Congress leader criticizes | 'मोदी-शहांना गडकरी आवडत नाहीत', सावरकर-हेडगेवर प्रकरणावरुन काँग्रेस नेत्याची टीका

'मोदी-शहांना गडकरी आवडत नाहीत', सावरकर-हेडगेवर प्रकरणावरुन काँग्रेस नेत्याची टीका

googlenewsNext

Karnataka Syllabus Controversy: कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शालेय पुस्तकातून राष्ट्रीय स्वयंसेवस संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि वीर सावरकर यांच्यावर आधारित धडे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा भाजपकडून जोरदार विरोध होत आहे. भाजप सरकारच्या काळात हे धडे अभ्यासक्रमात टाकण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेस सरकारचा हा निर्णय दुर्दैवी असल्याची टीका केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

काँग्रेस नेते गौरव वल्लभ म्हणाले की, 'भारत आणि कर्नाटकातील विद्यार्थ्यांनी हेडगेवार आणि सावरकर यांच्या विचारसरणीऐवजी भीमराव आंबेडकर, जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचे वाचन केले पाहिजे. महात्मा गांधींना मारणाऱ्या गोडसेची विचारधारा पुढे नेणाऱ्या सावरकर आणि हेडगेवारांची विचारधारा मुलांना शिकवू शकत नाहीत.''

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाच दिवसांपूर्वी महात्मा गांधींचा मारेकरी गोडसे हा भारताचा सुपुत्र असल्याचे म्हटले होते. ती विचारधारा आम्ही कशी पुढे नेणार? इंग्रजांकडून 60 रुपये पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीची विचारधारा पुढे नेणार? सावरकरांची हेडगेवारांची विचारधारा भारताची विचारधारा नाहीये. पीएम मोदी आणि अमित शहांना नितीन गडकरी आवडत नाहीत, त्यामुळे गडकरी RSS ला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत,'' अशी टीका गौरव यांनी केली.

काय म्हणाले होते गडकरी?
नितीन गडकरी शनिवारी (17 जून) नागपुरात वि.दा. सावरकर यांच्यावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “शालेय अभ्यासक्रमातून डॉ. हेडगेवार आणि वीर सावरकर यांच्याशी संबंधित अध्याय काढून टाकण्यात आले आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यापेक्षा वेदनादायक काहीही असू शकत नाही. सावरकर हे समाजसुधारक होते आणि ते आपल्यासाठी आदर्श आहेत,'' असं गडकरी म्हणाले होते. 

Web Title: Karnataka Syllabus Controversy: 'Narendra Modi-Amit Shah don't like Nitin Gadkari', Congress leader criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.