Karnataka Election Results 2018: कर्नाटकात कमळ; सीएम येडियुरप्पाच, बहुमतासाठी लागणार 112 आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 07:07 AM2018-05-17T07:07:02+5:302018-05-17T07:07:02+5:30

कर्नाटकात अखेर कमळ फुलले असून, १०५ आमदार असलेल्या भाजपाला राज्यपाल वजूभाई वाला यांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे, तसेच पंधरा दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.

Karnataka Election Results 2018: Lotus in Karnataka; CM Yeddyurappa, 112 MLAs will be elected for a majority | Karnataka Election Results 2018: कर्नाटकात कमळ; सीएम येडियुरप्पाच, बहुमतासाठी लागणार 112 आमदार

Karnataka Election Results 2018: कर्नाटकात कमळ; सीएम येडियुरप्पाच, बहुमतासाठी लागणार 112 आमदार

googlenewsNext

बंगळुरू : कर्नाटकात अखेर कमळ फुलले असून, १०५ आमदार असलेल्या भाजपाला राज्यपाल वजूभाई वाला यांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे, तसेच पंधरा दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांचा शपथविधी होणार असून, बहुमताची परीक्षा पास झाल्यावर, इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचे कळते. काँग्रेस-जनता दल (धर्मनिरपेक्ष) आघाडीतर्फे कुमारस्वामी यांनी ११७ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर केले होते. मात्र, त्यांच्याऐवजी राज्यपालांनी येडियुरप्पा यांना निमंत्रित केले. राजभवनाऐवजी भाजपाचे प्रवक्ते आ. सुरेशकुमार यांनी कानडीमध्ये टिष्ट्वट करून येडियुरप्पांच्या शपथविधीची माहिती दिली होती. मात्र, नंतर हे टिष्ट्वट त्यांनी मागेही घेतले. त्यानंतर, अर्ध्या तासातच राज्यपालांचे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले़ आता कर्नाटकात ‘धन की बात’ सुरू होईल, अशी टीका काँग्रेसने केली.
>आमदार अज्ञातस्थळी रवाना
भाजपाने काँग्रेस व जनता दलाच्या आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. काही आमदारांनी स्वत:हून आमच्याशी भाजपाने संपर्क साधला होता, असे जाहीरपणे सांगितले.
बहुमतासाठी १0 ते १२ आमदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसच्या सर्व आमदारांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे. तशी वेळ भाजपाने आणली, असे काँग्रेसचे नेते अशोक गहलोत यांनी सांगितले. कुमारस्वामी यांनीही आपल्या आमदारांसाठी अशीच व्यवस्था केली आहे.
>आमदारामागे
१00 कोटी?
भाजपा एकेका आमदारामागे १00 कोटी रुपये देण्याच्या तयारीत आहे, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला. पण कोणत्या नेत्याने व कोणाला ही रक्कम देऊ केली, हे सांगितले नाही. यावर भाजपानेते प्रकाश जावडेकर यांनी हा काँग्रेस, जनतादलाचा कल्पनाविलास असल्याचे म्हटले आहे़
>आमदार फोडावे लागणार
एक अपक्ष आमदार पी. शंकर यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केल्याने येडियुरप्पा यांच्याकडे १0५ जण झाले. मात्र तरीही बहुमतासाठी अन्य पक्षांचे आमदार फोडावे लागतील. त्याशिवाय त्यांना बहुमत सिद्ध करताच येणार नाही. त्यामुळे भाजपाने काँग्रेस व जनता दलाच्या आमदारांशी संपर्क साधायला सुरुवात केल्याचे कळते.

Web Title: Karnataka Election Results 2018: Lotus in Karnataka; CM Yeddyurappa, 112 MLAs will be elected for a majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.