'...तर उद्या पावसामुळे आणि थंडीमुळे इव्हीएममध्ये बिघाड झाला म्हणतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 09:23 AM2018-05-29T09:23:56+5:302018-05-29T09:23:56+5:30

अखिलेश यादव यांनी निशाणा साधला आहे.

kairana noorpur bypolls akhilesh yadav tweet on evm failure | '...तर उद्या पावसामुळे आणि थंडीमुळे इव्हीएममध्ये बिघाड झाला म्हणतील'

'...तर उद्या पावसामुळे आणि थंडीमुळे इव्हीएममध्ये बिघाड झाला म्हणतील'

Next

लखनऊ- उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी सोमवारी मतदान पार पडलं. मतदानादरम्यान काही इव्हीएम मशिन्स खराब झाल्याच्या घटना घडल्या. या मुद्द्यावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निशाणा साधला आहे.  कडक उन्हामुळे इव्हीएममध्ये बिघाड झाल्याचं अधिकारी सांगतलं. अधिकाऱ्यांच्या या वक्तव्याचा अखिलेश यांनी समाचार घेतला. आज उन्हामुळे इव्हीएम काम करत नसल्याचं सांगितलं जात आहे. उद्या पावसामुळे आणि थंडीमुळे इव्हीएम काम कर नाही असं म्हणतील. काही लोक जनतेला रांगेत उभा करून आपल्या सत्तेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी आम्ही पुन्हा करतो आहे, असं ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे.  



 

अती उन्हामुळे इव्हीएममध्ये बिघाड होत आहे. पण कुठेही इव्हीएममुळे निवडणूकीवर परिणाम होणार नाही. आमच्याकडे योग्य प्रमाणात अतिरिक्त यंत्रं आहेत. यंत्रात बिघाड ही तांत्रिक अडचण आहे. कडक उन्हामुळे व्हीव्हीपॅट खराब होत आहेत, असं मुख्य निवडणूक आयुक्त एल वेंकटेश्वर लू यांनी सोमवारी म्हटलं होतं. 

हजारो इव्हीएम मशिन खराब होच आहेत. शेतकरी, मजदूर, महिला आणि तरूण कडक उन्हात रांगेत उभे आहेत. हा तांत्रिक बिघाड आहे की निवडणूक आयोगाचं अपयश? की लोकांना मतदानापासून वंचित  ठेवण्याचा प्रयत्न? अशामुळे लोकशाहीचा पाया कमकूवत होईल, असंही ट्विट अखिलेश यादव यांनी केलं आहे.  
 

Web Title: kairana noorpur bypolls akhilesh yadav tweet on evm failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.