JNU मधील घोषणाबाजी : पटियाला हाऊस न्यायालयात चार्जशीट, कन्हैय्या कुमारसह 10 जणांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:53 AM2019-01-14T10:53:18+5:302019-01-14T10:54:21+5:30

दिल्लीतील जेएनयूमध्ये 9 फेब्रुवारी 2016 रोजी विद्यार्थी संघटनांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. या संघटनेचं नेतृत्व कन्हैय्या कुमार यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

JNU scandal: Chargesheet in Patiala house court, names of 10 people including Kanhaiya Kumar | JNU मधील घोषणाबाजी : पटियाला हाऊस न्यायालयात चार्जशीट, कन्हैय्या कुमारसह 10 जणांची नावे

JNU मधील घोषणाबाजी : पटियाला हाऊस न्यायालयात चार्जशीट, कन्हैय्या कुमारसह 10 जणांची नावे

googlenewsNext

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील जवाहरला नेहरु विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्याबाबतचा तपास पूर्ण झाला आहे. याप्रकरणी आज विशेष पथकाकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या दोषारोपपत्रात जेएनयुच्या विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार, सैयर उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांसह 10 जणांची नावे असल्याची माहिती आहे. 

दिल्लीतील जेएनयूमध्ये 9 फेब्रुवारी 2016 रोजी विद्यार्थी संघटनांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. या संघटनेचं नेतृत्व कन्हैय्या कुमार यांनी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठा आवारातील या आंदोलनासाठी कुठलिही परवानगी घेण्यात आली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणी तब्बल 3 वर्षांनी आज दोषारोपपत्र दाखल करण्यात येत आहे. त्यामध्ये कन्हैयाकुमारसह 10 जणांची नावे आहेत. त्यापैकी आकिब हुसैन, मुजीब हुसैन, मुनीब हुसैन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली, और खलिद बशीर भट हे जम्मू आणि काश्मीर येथील रहिवासी आहेत. 

दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात हे दोषारोपपत्र सादर केले जाणार आहे. त्यामुळे, प्रत्येक ठिकाणी सभेत किंवा भाषणात कन्हैय्या कुमार यांच्याकडून सरकार चार्जशीट कधी दाखल करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. आता, त्या प्रश्नाला पूर्णविराम मिळू शकतो. दरम्यान, 9 फेब्रुवारीच्या आंदोलनावेळी, कन्हैय्या कुमार यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, आंदोलक विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरू केल्याचं या दोषारोपपत्रात म्हटले आहे.  

Web Title: JNU scandal: Chargesheet in Patiala house court, names of 10 people including Kanhaiya Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.