राज्याची खबरबात! बंदुकीच्या ‘बुलेट’ला मिळणार ‘बॅलेट’ने उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 12:36 PM2024-04-11T12:36:38+5:302024-04-11T12:37:05+5:30

दोन दशकांनंतर ११८पेक्षा अधिक बुथवर प्रथमच लोकसभेसाठी मतदान होणार

Jharkhand News of the state! Gun 'bullet' will get the answer with 'ballot'! | राज्याची खबरबात! बंदुकीच्या ‘बुलेट’ला मिळणार ‘बॅलेट’ने उत्तर!

राज्याची खबरबात! बंदुकीच्या ‘बुलेट’ला मिळणार ‘बॅलेट’ने उत्तर!

मनोज भिवगडे

रांची : झारखंडमधील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात दोन दशकांपासून बंदुकीच्या जोरावर नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून रोखण्यात आले होते. विशेषतः पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील अशा ११८पेक्षा अधिक अतिसंवेदनशील बूथवर यंदा ‘बुलेट’ला ‘बॅलेट’ने उत्तर देण्यासाठी लोकसभा निवडणुकीकरिता प्रथमच १३ मे रोजी मतदान करून घेण्यासाठी प्रशासन, सुरक्षा दलाने जय्यत तयारी केली आहे.

बिहार राज्यातून वेगळे झालेल्या झारखंडची स्थापना १५ नोव्हेंबर २००० रोजी झाली. २४ जिल्ह्यांच्या या राज्यात तेव्हा १८ जिल्हे नक्षल प्रभावित होते. त्यापैकी बहुतांश जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी टोकाची भूमिका घेत निवडणुकीदरम्यान मतदान होऊ दिले नाही. अतिदुर्गम भागात असलेल्या बूथपर्यंत तर पोहोचणेही शक्य नव्हते. मात्र, गेल्या काही वर्षांत नक्षल चळवळ मोडून काढण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या स्तरावरून करण्यात आलेल्या प्रयत्नामुळे आता झारखंडमध्ये ज्या भागात कधीही ज्यांच्या बोटावर शाई लागली नाही, तेथील नागरिकही लोकशाहीच्या उत्सवात यंदा निर्भीडपणे सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत.

आठ जिल्हे अतिनक्षल प्रभावित
nझारखंडमध्ये कधीकाळी २४ पैकी १८ जिल्हे नक्षल प्रभावित होते. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नक्षली कारवाया होत आल्यात. आता ही संख्या घटून आठवर आली आहे.
nअतिनक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये चतरा, लातेहार, लोहरदगा, गुमला, खुंटी, सरायकेला, पश्चिम सिंहभूम आणि गिरीडीह या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे.

अतिसंवेदनशील बुथची संख्या घटली
बुथचे प्रकार    २०१९    २०२४    घट-वाढ
अतिसंवेदनशील    १,८६१    १,४२२    ४३९ बूथ कमी झाले
संवेदनशील    ३,४७०    ९,२६५    ५,७९५ बूथ वाढले
सामान्य    २५,९९४    २०,२५६    ५,७३८ बूथ कमी झाले

गत लोकसभा निवडणुकीत काय झाले?

झारखंडमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षली पथकांकडून अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले होते.
लातेहार येथे निवडणूक बंदोबस्तावर असलेल्या सुरक्षारक्षकांवर हल्ला करण्यात आला होता.

पलामू येथे निवडणुकीच्या कामात बाधा आणण्याचा प्रयत्न करीत पोलिंग पार्टीवरच हल्ला करण्यात आला.
रांची, लोहरदगा येथे उमेदवारांची
प्रचार वाहने पेटविण्याच्या घटना घडल्या होत्या.
रांची, लोहरदगा येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसोबत नक्षल्यांची चकमक उडाली होती.

Web Title: Jharkhand News of the state! Gun 'bullet' will get the answer with 'ballot'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.