J&K Operation All Out: काश्मीर घाटीत ऑपरेशन ऑल आउट सुरू, गेल्या 24 तासांत 4 दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 11:36 AM2022-06-08T11:36:44+5:302022-06-08T11:36:59+5:30

J&K Operation All Out: सोमवारी ते मंगळवारदरम्यान सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुपवाडा येथे दोन दहशतवादी मारले गेले तर सोपोर आणि शोपियानमध्ये प्रत्येकी एक दहशतवादी ठार झाला.

Jammu and Kashmir News: Operation All Out begins in Kashmir Valley, 4 terrorists killed in last 24 hours | J&K Operation All Out: काश्मीर घाटीत ऑपरेशन ऑल आउट सुरू, गेल्या 24 तासांत 4 दहशतवादी ठार

J&K Operation All Out: काश्मीर घाटीत ऑपरेशन ऑल आउट सुरू, गेल्या 24 तासांत 4 दहशतवादी ठार

Next

Security Forces Killed Terrorist: काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्यानंतर सुरक्षा दलांनी ऑपरेशन ऑल आऊट सुरू केले आहे. काश्मिरी पंडितांपासून ते इतर सामान्य लोकांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या दहशतवाद्यांना या ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत ठार केले जात आहेत. या क्रमाने सुरक्षा दलांनी गेल्या 24 तासांत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

सोमवारी ते मंगळवारदरम्यान सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुपवाडा येथे दोन दहशतवादी मारले गेले तर सोपोर आणि शोपियानमध्ये प्रत्येकी एक दहशतवादी मारला गेला. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत बैठक झाली होती. या बैठकीत मोदी सरकारच्या दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसीची आठवण करून देत, खोऱ्यातील शांतता बिघडवणाऱ्यांना शोधून ठार करण्याच्या सूचना सुरक्षा दलांना देण्यात आल्या होत्या.

दोन पाकिस्तानी दहशतवादीही मारले गेले
ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही समावेश आहे. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे होते. तुफैल असे एका दहशतवाद्याचे नाव आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुपवाड्यातील चकतरस कंडी भागात दहशतवादी असल्याच्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. यानंतर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली. यानंतर शोधमोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले आणि प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली.

दहशतवाद्यांना अटक करण्यात आली
72 तासांत सुमारे 18 दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांना अटक करण्यात आली आहे. उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील कठुआ ते कुपवाडापर्यंत या अटक करण्यात आल्या आहेत. यामध्ये 2 दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांचा समावेश आहे. यांनीच शोपियानमध्ये लष्कराच्या वाहनात आयईडी स्फोट घडवून आणला होता. अटक करण्यात आलेले दहशतवादी आणि त्यांचे सहकारी हे काश्मीरमध्ये लपून बसलेल्या गुलाम या दहशतवादी कमांडरच्या सतत संपर्कात होते.

Web Title: Jammu and Kashmir News: Operation All Out begins in Kashmir Valley, 4 terrorists killed in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.