फणस बनले केरळचे राज्यफळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 08:37 AM2018-03-23T08:37:14+5:302018-03-23T08:37:14+5:30

केरळमध्ये दरवर्षी ३० कोटींहून अधिक फणसांचे उत्पादन होते

Jackfruit declared Kerala’s official fruit | फणस बनले केरळचे राज्यफळ

फणस बनले केरळचे राज्यफळ

googlenewsNext

तिरूवनंतपूरम : वरून काटे व आत गोड, रसाळ गरे असलेल्या फणसाला केरळ राज्याने बुधवारी राज्यफळाचा मान बहाल केला. राज्याचे कृषिमंत्री व्ही. एस. सुनीलकुमार यांनी विधानसभेत ही घोषणा केली. केरळमध्ये दरवर्षी ३० कोटींहून अधिक फणसांचे उत्पादन
होते. केरळचा फणस आणि त्यापासून बनविलेल्या उत्पादनांचा देशभर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे सांगून सुनीलकुमार म्हणाले की, यातून सुमारे १५ हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. झाडाला लागणारे सर्वांत मोठे फळ अशी ओळख असलेल्या फणसाला हा मान देणारे केरळ हे पहिले राज्य असले तरी फणसाच्या उत्पादनात केरळचा देशात सहावा क्रमांक लागतो. 

देशभरात वर्षाला सुमारे १९०० हजार टन फणसाचे उत्पादन होत असले तरी त्यापैकी सुमारे ३० टक्के फणस ग्राहकापर्यंत पोहोचण्याआधीच सडून जातात. म्हणूनच फणसावर प्रक्रिया करून टिकाऊ उत्पादने तयार करण्यास खूप वाव आहे. २० राज्यांमध्ये फणस पिकत असले तरी त्रिपुराचा क्रमांक त्यात पहिला आहे. त्याखालोखाल ओरिसा, आसाम, प. बंगाल, कर्नाटक, केरळ, छत्तीसगढ, झारखंड व मध्य प्रदेश ही सर्वाधिक उत्पादन करणारी राज्ये आहेत. उत्पादनाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात १५वा क्रमांक लागतो.

Web Title: Jackfruit declared Kerala’s official fruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Keralaकेरळ