मतदारांशी संपर्क साधून यशस्वी अंदाज वर्तवणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 06:13 AM2019-05-26T06:13:49+5:302019-05-26T06:14:10+5:30

देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तवण्यात भलेभले दिग्गज अपयशी ठरले असताना ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने वर्तवलेला अंदाज अचूक ठरला आहे.

It is possible to communicate with voters and predict successful predictions | मतदारांशी संपर्क साधून यशस्वी अंदाज वर्तवणे शक्य

मतदारांशी संपर्क साधून यशस्वी अंदाज वर्तवणे शक्य

Next

- खलील गिरकर 
देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज वर्तवण्यात भलेभले दिग्गज अपयशी ठरले असताना ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने वर्तवलेला अंदाज अचूक ठरला आहे. याबाबत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : लोकसभा निकालाबाबत अनेकांचे अंदाज पूर्णत: चुकत असताना तुमच्या संस्थेने वर्तवलेला अंदाज बरोबर कसा आला, यामागे काय वेगळे तंत्र आहे
उत्तर : आमच्या संस्थेला निवडणूक निकालाचा अंदाज वर्तवण्याचा चांगला अनुभव आहे. आम्ही २०१३ पासून विविध ३६ निवडणुकांचे निकाल वर्तवले असून ते ३४ वेळा योग्य ठरले आहेत. आमची कामाची पद्धत इतरांपेक्षा काहीशी वेगळी आहे. आम्ही अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने काम करत आलो आहोत. त्यामुळे आमचे अंदाज तंतोतंत बरोबर येतात.
प्रश्न : लोकसभा निवडणूक निकालाचे भाकीत वर्तवण्यासाठी काय परिश्रम घेतले होते?
उत्तर : आम्ही आमच्या सहकाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले होते. आमच्या सहकाऱ्यांनी देशातील लोकसभा मतदारसंघात जाऊन विविध वयोगटातील व विविध जातीय, राजकीय, सामाजिक, आर्थिक गटाच्या नागरिकांसोबत संवाद साधला आहे. देशभरात ७ लाख ४२ हजार १८७ जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आमच्या ५४२ सदस्यांच्या टीमने यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. आम्ही केवळ मतदानोत्तर अंदाज वर्तवले होते. १२ एप्रिल ते १९ मे यादरम्यान आमची टीम देशभरात कार्यरत होती. प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची आपली वेगळी ओळख असते. त्यांचे वेगळे वैशिष्ट्य असते. त्याचा अभ्यास करून आमचे सहकारी काम करतात. सर्वप्रथम आम्ही तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचतो. त्यांच्याशी संवाद साधतो व त्यांच्या भावना जाणून घेतो. त्यानंतर प्रश्नावलीच्या माध्यमातून त्यांची मुलाखत घेतो. प्रत्येक मतदारसंघात सरासरी १३७० जणांशी आम्ही संवाद साधला.
‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने एनडीएला ३३९ ते ३६५ जागा व यूपीएला ७७ ते १०८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता.
>अचूक अंदाज
‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व बहुजन समाजवादी पक्षाच्या आघाडीला १० ते १६ जागा मिळण्याचे भाकीत वर्तवले होते. प्रत्यक्षात या राज्यात सप-बसप आघाडीला १५ जागा मिळाल्या आहेत. इतरांना ५९ ते ७९ जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला होता. प्रत्यक्षातील निकालाने या भाकिताचे अचूकपण सिद्ध केले आहे.
>१९९३ पासूनच्या संघर्षाला यश
सन १९९३ मध्ये मध्य प्रदेशच्या एका गावातून मुंबईत आलेल्या गुप्ता यांनी इतरांप्रमाणे संघर्ष करत आपली मार्गक्रमणा ्रकरण्याचा प्रयत्न केला. त्यापूर्वी ते दिल्लीत काही काळ काम करत होते. २०१३ पासून त्यांनी निवडणूक निकालाचा अंदाज वर्तवण्याचे काम सुरू केले. आतापर्यंत ३६ निवडणुकांच्या निकालाचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ही ३७ वी वेळ होती. आतापर्यंत त्यांचे दोन वेळा अंदाज चुकले आहेत. इतर सर्व अंदाज बरोबर आले आहेत.

Web Title: It is possible to communicate with voters and predict successful predictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.