घर, प्लॉट, बाईक... 45 दिवसांत 2.5 लाखांची कमाई; लोकांकडे भीक मागून 'तिने' जमवली संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 12:11 PM2024-02-13T12:11:59+5:302024-02-13T12:25:00+5:30

इंद्राबाई असं या महिलेचं नाव असून ती आपल्या मुलांना इंदूरमध्ये भीक मागायला लावत असे. पाच मुलांची आई असलेल्या इंद्राने मुलांकडून भीक मागून घेऊन दुमजली घर बांधलं आणि एक प्लॉट खरेदी केला.

indore woman made money by forcing kids to beg rs 2 5 lakh in 45 days | घर, प्लॉट, बाईक... 45 दिवसांत 2.5 लाखांची कमाई; लोकांकडे भीक मागून 'तिने' जमवली संपत्ती

घर, प्लॉट, बाईक... 45 दिवसांत 2.5 लाखांची कमाई; लोकांकडे भीक मागून 'तिने' जमवली संपत्ती

मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेची कमाई ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ही महिला दर महिना जवळपास 1.6 लाख रुपये कमवायची. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्राबाई असं या महिलेचं नाव असून ती आपल्या मुलांना इंदूरमध्ये भीक मागायला लावत असे. पाच मुलांची आई असलेल्या इंद्राने मुलांकडून भीक मागून घेऊन दुमजली घर बांधलं आणि एक प्लॉट खरेदी केला. ती 20 हजार रुपयांचा स्मार्टफोन वापरते आणि घरात एक बाईकही आहे. 

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इंद्राला यापूर्वीही असं करताना पकडण्यात आलं आहे. सोमवारी तिला जेलमध्ये पाठवण्यात आलं. इंद्राला पाच मुलं आहेत. मुलांचे वय 10, 8, 7, 3 आणि 2 वर्षे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती मुलांना इंदूरमधील लवकुश चौकात बसवायची. इथून रस्ता महाकाल मंदिरासह उज्जैनकडे जातो. आपल्या सात वर्षांच्या मुलीसह भीक मागताना ती पकडली गेली. 

इंद्राचा नवरा आणि दोन मुलं पळून गेली. अधिकाऱ्यांना इंद्राकडून 19,600 रुपये आणि तिच्या मुलीकडून 600 रुपये सापडले. इंद्राने सांगितलं की, अटक होणाच्या आधी 45 दिवसांत तिने या पद्धतीने अडीच लाख रुपये कमावले होते. राजस्थानमधील कोटा येथे तिचे दुमजली घर आणि शेतजमीन असल्याचं सांगितलं. भीक मागून तिने हे सर्व मिळवलं आहे.

इंदूर महानगरपालिकेच्या सहकार्याने प्रवेश नावाची स्वयंसेवी संस्था भिकाऱ्यांसाठी मोहीम राबवत आहे. या लोकांनी इंद्रा आणि तिच्या मुलीला पकडलं तेव्हा तिने त्यांच्याशी भांडण केलं. आम्ही भुकेने मरण्याऐवजी भीक मागणं निवडलं. चोरी करण्यापेक्षा हे चांगलं आहे असं ती म्हणाली. पोलिसांनी इंद्राला ताब्यात घेतलं आणि तिच्या मुलीला एका एनजीओकडे सोपवलं.
 

Web Title: indore woman made money by forcing kids to beg rs 2 5 lakh in 45 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beggarभिकारी